आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा गांगुलीवर भडकला सचिन, दौऱ्यातूनच घरी पाठवायची दिली होती धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवृत्तीनंतर खेळाडू अनेक किस्से जाहिरपणे सांगतात. जे ऐकून अनेकदा थक्क झाल्यासारखे होते. आज (8 जुलै) ला 43 वा वाढदिवस साजरा करत असलेल्या गांगुलीने एकदा असाच सचिन तेंडुलकरच्या बाबतीत गौप्यस्फोट केला होता. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

1997 मध्ये तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील संघ कॅरेबियन दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी संघाची कामगिरी चांगली होत नव्हती. म्हणून तेंडुलकर खेळाडूंवर नाराज होता. गांगुलीला अर्धवट दौऱ्यातून घरी पाठवायची धामकीदेखील त्याने दिली होती.
भारत हारला मास्टर ब्लास्टर भडकला
बारबडोसाच्या तीसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजने भारताला 38 धावांनी हरवले. त्या मैदानावर भारतीय संघाचे खेळाडू अक्षरश: गल्ली क्रिकेटप्रमाणेच खेळले. 120 धावांचा पाठलाग करताना मास्टर ब्लास्टरचा भारतीय संघ केवळ 81 धावातच तंबूत परतला. गांगुलीने या गौप्यस्फोटाची सुरुवात त्याच्या एका लेखात 'माय फॉल्ट अॅक्चुअली'ने केली आहे. तो पुढे म्हणतो, "सचिन अत्यंत निराश होता आणि खेळाडूंवरही अत्यंत चिडलेला होता. त्याचा मूड बदलावा म्हणून मी त्याला विचारले, 'मी काय करावे असे तुला वाटते'? सचिन म्हणाला, 'उद्या सकाळी ऊठून धावायला जा'.''
'त्या भीतिमुळेच आला जोश'
गांगुली पुढे लिहितो, ''आता हे सांगण्याची खरी वेळ आली आहे. जेव्हा सचिनला कळले की, मी दुसऱ्या दिवशी धावण्यासाठी गेलो नाही तेव्हा तो प्रचंड संतापला. त्याने मला अशा शब्दांत झापले की, जे मी लिहूच शकत नाही. तो म्हणाला होता, 'तू तुझ्यात सुधारणा केली नाही तर, अर्धवट दौऱ्यातून तुला घरी पाठवावे लागेल'. तुझे करियरच संपेल. चालू असलेल्या दौऱ्यातूनच घरी पाठवायच्या भीतिनेमात्र माझ्यात जोश निर्माण झाला. मी दुसऱ्या दिवसापासूनच प्रामाणिकपणे कामाला लागलो.
पुढील स्लाइडसवर पाहा, गांगुलवर दुसऱ्यांदा केव्हा चिडला सचिन...