आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Having Sourav Ganguly As India's Head Coach Would Be A Bad Idea

अागामी बैठकीत शास्त्रींचे भवितव्य; माजी कर्णधार साैरव गांगुलीची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप रवी शास्त्री यांच्या टीम इंडियाच्या संचालकपदाच्या कार्यकाळाबाबत निश्चित केलेले नाही. मात्र, अागामी बैठकीत शास्त्री यांचे भवितव्य निश्चित करण्यात येणार अाहे, अशी माहिती भारतीय संघाचा माजी कर्णधार साैरव गांगुलीने दिली. त्याची नुकतीच सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात अाली. बीसीसीअायची बैठक कधी हाेणार, हे अद्याप निश्चित नाही.

‘भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक काेण असेल अाणि बैठक कधी हाेईल, हे मला अद्याप माहीत नाही,’ असे या वेळी गांगुलीने सांगितले. बांगलादेशविरुद्ध कसाेटीतून हरभजनसिंगने दमदार पुनरागमन केले,असेही ताे म्हणाला.
टी-२० मध्ये खेळणार
अांतरराष्ट्रीय माजी खेळाडूंच्या अागामी टी-२० क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची इच्छा गांगुलीने व्यक्त केली. सचिन तेंडुलकर अाणि शेन वॉर्न या लीगचे अायाेजन करणार अाहेत. ही लीग पुढच्या वर्षी हाेण्याची शक्यता अाहे.

शास्त्रीकडून स्नेहभोजन
टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी पावसामुळे ड्रॉ झालेल्या एकमेव कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना डिनर दिले. चांगली कामगिरी केल्यामुळे शास्त्री यांनी जेवण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.