आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bombay High Court Refuses To Stay First IPL Match At Wankhede

आयपीएलची \'गुढी\' महाराष्‍ट्रातच, वानखेडेवर रंगणार पहिली मॅच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलचे सामने महाराष्‍ट्रात होणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला असतानाच उच्‍च न्‍यायालयाने शुक्रवार, 9 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्‍टेडियमवर होणाऱ्या मुंबई विरुद्ध पुणे सामन्याला मंजुरी दिली. दरम्‍यान, यानंतर मुंबई आणि नागपूरमध्‍ये होणाऱ्या इतर 19 मॅच नियोजित ठिकाणीच होणार की नाही यावर 12 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
बुधवारी काय म्‍हटले होते न्‍यायालयाने
> महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना क्रिकेटच्या नावाखाली मैदानांसाठी सुरू असलेल्या पाण्याच्या नासाडीवरून हायकोर्टाने बीसीसीआय, महाराष्ट्र मुंबई क्रिकेट संघटनेला बुधवारी फटकारले होते.
> 'तुमच्या दृष्टीने क्रिकेट सामने जास्त महत्त्वाचे आहेत काय, तुमचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, तेव्हाच लक्षात येईल,' अशा शब्दांत फटकारले होते.
> जेथे पाणी भरपूर आहे तेथे महाराष्ट्राबाहेर आयपीएल सामने खेळवा, असे कोर्टाने सुनावले.
सरकारची जबाबदारी
पाण्याचीनासाडी रोखण्यासाठी पावले उचलणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. आयपीएल सामन्यांवर होणारी पाण्याची नासाडी रोखण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, हे सांगण्याचे निर्देश मंगळवारी उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. 'लोकसत्ता मूव्हमेंट' या एनजीओच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने बीसीसीआयची अक्षरश: कानउघाडणीच केली होते. त्‍या गुरुवारी सुनावणी करण्‍यात आली.

वानखेडेवर 40 लाख लिटरची नासाडी
वानखेडे स्टेडियमच्या देखभालीवर किती पाणी खर्च होईल, अशी विचारणा हायकोर्टाने केली. त्यावर 40 लाख लिटर पाणी वापरले जाईल, असे एमसीएच्या वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालय म्हणाले, हे खूपच जास्त आहे.

> तहानलेल्या बारामती तालुक्यातील 61 हजारांवर लोकसंख्या सध्या 30 टँकरवर अवलंबून आहे. सध्या 19 गावे आणि 203 वाड्या-वस्त्यांना टँकरची वाट पाहावी लागते. सध्या रोज टँकरच्या 91 खेपा कराव्या लागत आहेत. येत्या काही दिवसांत यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
> मैदान परिसरात असलेल्या बोअरचे पाणी मैदानासाठी वापरले जाते. या गवताची हिरवाई शाबूत ठेवण्यासाठी दिवसाआड 50 हजार लिटर पाणी वापरावे लागते. भविष्यातही मैदानाचा दर्जा याच पद्धतीने कायम राखला जाईल. त्यासाठी बोअरचे पाणी वापरावे लागेल.