आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवी-हेजलने \'मेहंदी\'नंतर दिली खास पोझ, चंदीगडमध्ये आज सायंकाळी विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच हे दोघे आज (30 नोव्हेंबर) सायंकाळी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. चंडीगडमधील हॉटेल 'द ललित'मध्ये विवाह सोहळा होणार आहे. युवीने मेंदीचे फोटो केले शेअर...
- युवी मंगळवारी मेंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात युवी, हेजलसोबत ‍दिसत आहे.
- हेजलला बाहुपाशात घेेऊन त्याने तिच्या माथ्यावर किस करतानाची पोझ दिली आहे.
- हेजलच्या हातावर युवीच्या नावाची मेंदी सजलेली दिसत आहे. संगीतरजनी कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन केले आहे.
- युवीच्या विवाहासाठी टीम इंडियातील सर्व क्रिकेटपटूूंंनी खास डान्स बसवला आहे. या डान्सचे नियोजन कर्णधार विराट कोहलीने केले आहे.

संंगीतरजनीला मोजकेेच पाहुणे...
- मंगळवारी रात्री होणार्‍या संगीतरजनी कार्यक्रमाला युवीने मोजक्याच खास पाहुण्यांना निमंत्रित केले आहे.

असे होतील कार्यक्रम...
- 29 ला हॉटेल ललितमध्ये मेहंदी-शगुन
- 30 सकाळी मनसादेवी कॉम्प्लेक्स येथील घरी युवीला लागेल हळद
- 30 दुपारी युवराज-हेजल आनंद कारजमध्ये घेतील सहभाग
- 30 ला फतेहगड साहिब यांचा डेरा दुफेरामध्ये घेतील सातफेरे
- 30 रात्री टीम इंडिया-भारताच्या क्रिकेट टीमसोबत डिनर
- 2 डिसेंबरला हिंदु परंपरेनुसार गोव्यात विवाह, रात्री पार्टी
- 3 डिसेंबरला युवीच्या गोव्यातील बंगल्यात पार्टी
- 5 डिसेंबरला दिल्लीत संगीतरजनीचे आयोजन
- 7 डिसेंबरला दिल्लीत रिसेप्शन.

# टीम इंडियाला दुहेरी आनंद...
- मोहालीत सुरु असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 8 गडी राखून इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडवर विजय आणि युवीच्या विवाह, असा दुहेरी आनंद साजरा करण्याची टीम इंडिया संधी मिळाली आहे.
# विवाहनंतर आधी बाबाजींचे दर्शन...
- चंडीगडमध्ये वेडिंग सेरेमनीनंतर युवी-हेजल सर्वात आधी बाबाजींचे दर्शन घेणार आहेत. युवीच्या आईने सांगितले की, दोघे सर्वात आधी बाबा रामसिंग यांचा आशीर्वाद घेतील.
- हेजल हिच युवराजची अर्धांगिनी बनेल, असे बाबा रामसिंह यांनी युवीच्या आईला सांगितले होते.

पुढील स्लाइडवर पाहा, साताजन्माच्या प्रवासाला निघालेल्या युवी- हेजलचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...