आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Syas Yes I Am Engaged Cause I Found A Friend For Life In Hazel

युवराजने मौन सोडले, म्‍हणाला- हेजल सर्वात चांगली मैत्रीण, आईची छाया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराजने केलेले ट्वीट - Divya Marathi
युवराजने केलेले ट्वीट
नवी दिल्ली - अभिनेत्री हेजल कीच हिच्‍यासोबत साखरपुडा झाल्‍यानंतर क्रिकेटर युवराज सिंह याने पहिल्‍यांदाच मौन सोडले. त्‍याने ट्वीट करून म्‍हटले, 'होय, मी साखरपुडा केला आहे. कारण हेजलमध्‍ये एक चांगली मैत्रीण आहे. माझी आई म्‍हणते की तिच्‍यामध्‍ये तिची छाया आहे,' अशी भावना युवराज याने व्‍यक्‍त केली.
युवराजच्‍या आईने काय प्रतिक्रिया दिली
> युवराजच्‍या आई शबनम यांनी सोमवारी एका इंग्रजी वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत म्‍हटले, गत वर्षी युवराजच्‍या वाढदिवसारच्‍या कार्यक्रमात (12 डिसेंबर) मी पहिल्‍यांदा हेजलला भेटली.
> काही दिवसानंतर युवराजने सांगितले की, तो हेजलला पसंद करतो.
> हेजलसोबत पहिली भेट कशी होती या प्रश्‍नावर त्‍या म्‍हणाल्‍या, पार्टीत अनेक लोक होते. त्‍यामुळे ही भेट साधरणच होती. मात्र, त्‍या नंतरच्‍या भेटीत मलाही ती आवडली.
युवराजचे लग्‍न कधी होणार की शादी?
येणा-या वर्षात युवराज आणि हेजलचे लग्‍न होणार आहे. बालीमध्‍ये त्‍यांचा साखरपुडा झाला. फतेहगडममधील हंसालीवाला गुरुद्वारामध्‍ये त्‍यांचे लग्‍न होणार आहे. दरम्‍यान, चंदीगडमध्‍ये ते पार्टीसुद्धा देणार आहेत. युवराजच्‍या 34 व्‍या वाढदिवसाच्‍या दुस-या दिवशी म्‍हणजेच 13 डिसेंबरला हे लग्‍न होणार होते. पण, एका नातेवाईकाच्‍या मृत्‍यूनंतर तारीख पुढे ढकलण्‍यात आली.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो...