आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका आजपासून रंगणार;हरारेच्या मैदानावर सलामी सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे- वनडे पाठाेपाठ अाता टी-२० मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया शनिवारी मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि यजमान झिम्बाब्वे यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरुवात हाेत अाहे.

या मालिकेतील सलामीचा सामना हरारेच्या मैदानावर रंगणार अाहे. दाेन दिवसांपूर्वीच पाहुण्या भारतीय संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत यजमान झिम्बाब्वेचा ३-० ने सुपडासाफ केला. याच मालिका विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या भारतीय संघाचा टी-२० सिरीजही जिंकण्याच्या प्रयत्न असेल.

सलामी सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाच्या युवा गाेलंदाजांनी कसून सराव केला. या सामन्यात यांच्यावर सर्वांची नजर असेल.

यजमान टीमला अाता टी-२० मध्येही पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी कसरत करावी लागेल. बुमराह,अक्षर फाॅर्मात : भारताकडूनयुवा गाेलंदाज जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहल, धवल कुलकर्णी अक्षर पटेल फाॅर्मात अाहेत. या सर्वांनी वनडे मालिकेत धारदार गाेलंदाजी केली. बुमराहने दाेन वेळा चार गडी बाद करण्याचा पराक्रम गाजवला. तसेच धवलने पाच, चहलने सहा, अक्षर पटेलने तीन बरिंदर शरणने चार विकेट घेतल्या.

लाेकेश राहुलवर सर्वांची नजर :भारताचा युवा सलामीवीर लाेकेश राहुलवर अाता सर्वांची नजर असेल. त्याने वनडे मालिकेतील अव्वल कामगिरी करताना मालिकावीराचा बहुमान पटकावला. याशिवाय त्याने शतकी खेळी केली.

टीम इंडिया टाकणार ऑस्ट्रेलियाला मागे
भारतीय संघाला अाता सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याच्या यादीत अाॅस्ट्रेलिया, श्रीलंका अाणि न्यूझीलंडला पिछाडीवर टाकण्याची संधी अाहे. या यादीत टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर अाहे. भारताने अातापर्यंत ७३ पैकी ४४ टी-२० सामने जिंकले अाहेत. झिम्बाब्वेविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका ३-० ने जिंकल्यास भारतीय संघ अाता अाॅस्ट्रेलिया (८८ सामने, ४६ विजय), श्रीलंका (८४ सामने, ४६ विजय) अाणि न्यूझीलंडला (९३ सामने, ४६ विजय) मागे टाकू शकेल.