आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1 Lakh 77 Thousand Police Security For World, Divya Marathi

वर्ल्डकपच्या सुरक्षेसाठी 1 लाख 77 हजार पोलिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ- फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 12 जूनपासून फुटबॉलच्या विश्वातील सर्वात मोठय़ा स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी ब्राझीलचे वातावरण फुटबॉलमय झाले आहे. सर्वत्र फुटबॉल फीव्हर दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे चित्र रंगलेले आहे. या आनंदाच्या वातावरणात कोणत्याही प्रकारचे विघातक कृत्य घडू नये, यासाठी एक लाख 77 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मात्र, ब्राझीलमधील विघ्नसंतोषी नागरिकांमुळे सध्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजनकर्ते काहीसे अडचणीत आहे. या नागरिकांच्या वाढत्या विरोधांमुळेच सध्या ब्राझीलमधील वातावरण अधिकच गरम झालेले आहे. नागरिक निदर्शने करत आहेत.

या स्पर्धेला 1 लाख 77 हजार पोलिस कर्मचार्‍यांचा कडा पहारा असणार आहे. यात ब्राझील सरकारच्या 1 लाख 57 हजार पोलिसांचा समावेश आहे. तसेच फिफाचे 20 हजार सुरक्षा कर्मचारी सहभागी आहेत. या सुरक्षा व्यवस्थेवर ब्राझील शासनाने तब्बल 8 लाख 55 हजार डॉलरचा (5.03 कोटी) खर्च करत आहे.
2006 मध्ये सर्वाधिक कार्डचा विश्वविक्रम ठरला होता.
16 सर्वाधिक कार्ड (12 यलो, 4 रेड) हॉलंड -पोतरुगाल सामन्यात दाखवण्यात आले होते.
टीममध्ये मतभेद नाहीत : कोस्टास
अथेन्स - युनान संघाचा उपकर्णधार कोस्टास केटसौरेनिसने टीममधील मतभेदाचा आरोप फेटाळून लावला. याशिवाय त्याने आपल्या टीमचा सहकारी गियानिस मनिएटिसची सार्वजनिक माफीही मागितली आहे. युनानचा केटसौरेनिस आणि मनिएटिस वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या 23 सदस्यीय टीममध्ये सर्वात अनुभवी खेळाडू आहेत.
इंग्लंड टीमच्या हॉटेलवर छापे
आरोग्य अधिकार्‍यांनी रिओ दी जानेरिओ येथील हॉटेलांवर छापे टाकले आहेत. या ठिकाणी इंग्लंड आणि इटलीच्या संघाची निवास व्यवस्था करण्यात आली. या छाप्यात अधिकार्‍यांनी खराब पदार्थ जप्त केले आहेत.