नवी दिल्ली.- फीफा कप 2010 चा चॅम्पियन स्पेन, चिलीकडून 0-2 अशा गुणांनी हरल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. गतविजेत्यांचा यावेळचा प्रवास पहिल्या फेरीतच संपला आहे. स्पेनला स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी एक विजय किंवा एक ड्रॉ आवश्यक होता, परंतू यात टीम अयशस्वी ठरली. स्पॅनिश टीमने दोन सामन्यांत केवळ दोन गोल केले. या अपयशानंतर स्पेन अशा गटात सहभागी झाला आहे जे याआधी विश्वविजेते ठरले आणि पुढच्यावेळी पहिल्याच फेरीत बाद झाले. यात ब्राझील(1966), फ्रान्स(2002) आणि इटलीनंतर स्पेनचादेखील निराशाजनक रेकॉर्ड आहे.
चिलीने चुकता केला 2010 चा हिशेब -
चिलीने 2-0 ने स्पेनला हरवून 2010 वर्ल्डकपच्या दरम्यानच्या ग्रुप मॅचमध्ये स्पेनकडून 1-2 ने झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. गेल्या वर्ल्डकपमध्येदेखील स्पेनने सुरूवातीचे सामने गमावले होते. परंतू पुन्हा एकदा कमबॅक करत विश्वविजेत्याचा खिताब पटकावला होता. यावेळी असं झालं नाही आणि पहिल्याच सामन्यात नेदरलँडकडून मिळालेल्या पराभवाने स्पेनसमोर आवाहन निर्माण केले.
या पराभवामुळे पहिले दोन सामने खेळुनच बाहर पडलेल्या सैबेरियन देश स्पेनच्या नावाने अजून एक रेकॉर्ड तयार झाला आहे. आजपर्यंत कधीच इतिहासात असे घडले नव्हते. एडुआर्डो वार्गसने 20 व्या मिनटाला आणि चार्ल्स अरांगुईजने 43व्या मिनटाला केलेल्या गोलमुळे मराकाना स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याने स्पेनला या स्पर्धेतून बाहेर केले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा , स्पेनच्या पराभवाची पाच कारणे...