वाशिंग्टन - ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या फीफा विश्व चषकामध्ये अमेरिका प्री-क्वॉर्टर फायनल पर्यंत पोहोचले होते. परंतु देशामध्ये फुटबॉल संघाला अद्भूतपूर्व समर्थन मिळाल्याने आगामी 2026 च्या फीफा विश्व चषकाचे वेध अमेरिकेला लागले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह मोठ्या प्रमाणावर लोकांनी ट्वीट करुन अमेरिकन फुटबॉल संघाचे समर्थन केले आहे. ब्राझीलच्या ग्लोबो वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फीफाचे महासचिव जेरोम वाल्की यांनी खुलासा देताना म्हटले आहे की, आम्ही अमेरिकन फुटबॉलसंघासोबत काम करायला तयार आहोत. तसेच फुटबॉल बघायला फुटबॉल चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
वाल्कीने म्हटले की, 2022 च्या फुटबॉल विश्वचषकानंतर 2026 च्या विश्वचषकाच्या आयोजनासाठी आपण उत्सुक आहोत. फीफाचे प्रमुख सेप ब्लाटर यांना बीबीसीने म्हटले की अमेरिकेमध्ये फुटबॉल खुप लोकप्रिय असून त्याचा स्तर उंचावत जात आहे.