आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On France's Fifa World Cup Team By Kabir Mahajan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA: फ्रान्ससारखा ताळमेळ अन्य कोणत्याच संघात दिसत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिफा विश्वचषकात अनेक संघ दमदार प्रदर्शन करत आहेत. मात्र, फ्रान्सच्या अनुभवी आणि युवा खेळाडूंमध्ये असलेला ताळमेळ अन्य संघातील खेळाडूंत दिसून येत नाही. फ्रान्सच्या संघात ह्युगो, ललोरिस, प्रेट्रिसे अ‍ॅव्हेरा आणि करिम बेंजेमासारखे अनुभवी तसेच राफेल वराने, अ‍ॅन्टोइने गीजमॅने आणि पॉल पोग्मा यांच्यासारख्या युवा खेळाडूंचा भरणा आहे.
असा दर्जेदार व संतुलित संघ बांधणीचे संपूर्ण श्रेय प्रशिक्षक डिडियर डेसचँप्स यांना जाते. डिडियर स्वत: विश्वविजेत्या संघाचे कर्णधार होते आणि यंदाही त्यांची विजेतेपदावर नजर आहे. त्यांनी अवलंबलेली रोटेशन पॉलिसी बरीच यशस्वी ठरली आहे. योहान कबाये आणि ब्लेसी मातुडी हे सेंटर मिडफिल्डमध्ये खेळणारे खेळाडू फ्रान्सचे खरे बलस्थान आहेत. मूळ पॅरिसचे असलेले हे दोन्ही खेळाडू संघाला आपल्याच फॉर्मेशननुसार खेळवताना दिसतात आणि त्यात ते यशस्वीसुद्धा ठरले आहेत. होंडुरासविरुद्धच्या सामन्यात ते 4-2-3-1 आणि स्वित्झर्लंडविरुद्ध 4-3-3 फॉर्मेशनमध्ये खेळताना दिसले. कबायेला पासिंगची उत्कृष्ट समज असून तो लीलया पद्धतीने चेंडू पास करताना दिसतो. दुसरीकडे, मातुडीची शारीरिक क्षमता दर्जेदार असून त्याचे प्रदर्शनही आश्चर्यजनक आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवण्यात तो पटाईत आहे. याच मध्यवर्ती भूमिकेच्या बळावर फ्रान्समध्ये ब्राझीललाही पराभूत करण्याची क्षमता आहे.

जर्मनीचे जोक्विम लोव्ह यांच्याप्रमाणेच डिडियरसुद्धा आपल्या संघात नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यांचा स्टार खेळाडू फ्रॅन्स रिबेरी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला होता तेव्हा संघाला बराच संघर्ष करावा लागेल, असे मत फुटबॉल पंडितांनी व्यक्त केले होते. मात्र, गजीमेल आणि वलबुएना यांनी मात्र आपल्या कामगिरीने सर्वांची तोंडे बंद केली. फ्रान्सच्या संघात आंतरराष्‍ट्रीय स्तरावर सुपरस्टार ठरलेला एकही खेळाडू नाही. मात्र, ज्या पद्धतीने सध्या त्यांचा खेळ सुरू आहे, तो पाहून कोणीही त्यांच्याविरोधात शर्यत लावण्याची हिंमत करू शकणार नाही.