ढाका - बांगालादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनची पत्नी उम अहमद शिशिरची छेड काढणा-या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या अन्य एका सहका-याचा तपास सुरु आहे.
मीरपुर (ढाका) येथे 15 जून रोजी खेळल्या जात असलेल्या भारत विरुध्द बांगलादेश हा सामन्यादरम्यान अज्ञान दोन तरुणांनी शाकिब अल हसनच्या पत्नीची छेड काढली होती. त्याविरोधारत शाकिबने मीरपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी सतर्कता दाखवत एका आरोपीला पकडले आहे. तर दुस-याचा तपास सुरु असल्याचे मीरपुरच्या पोलिस अधिक्षकांनी सांगितले.
छेड काढणा-याची पिटाई
शाकिबच्या पत्नीची छेड काढणा-या तरुणाची बांगलादेश क्रिकेट समिती(बीसीबी) च्या सुरक्षा रक्षकांनी चांगलीच पिटाई केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा कर्मचा-यांसोबत शाकिबचासुध्दा समावेश होता.
पुढील स्लाइडवर पाहा, शाकिब आणि त्याच्या पत्नीची काही निवडक छायाचित्रे...