रियो डि जिनेरियो - ब्राझीलमध्ये फुटबॉलचा महाकुंभ सुरु आहे. प्रत्येक संघ आपली हुकमत सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहे. तर इंग्लड आणि स्पेनसारखे दिग्गज संघ या महाकुंभातून बाहेर पडले आहेत.
अत्यंत चुरसीच्या होत असलेल्या लढतींमध्ये खेळाडूंचे चाहते तर प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर येत आहेतच पण आपल्या देशाच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी खुद्द बेल्जियमची राजा आणि राणी यांनी हजेरी लावली आहे.
बेल्जियम बाद फेरीत
ग्रुप एच मध्ये झालेल्या बेल्जियम विरुध्द रशिया ही लढत पाहण्यासाठी बेल्जियमच्या राजा फेलिप आणि राणी पॉला यांनी उपस्थिती दर्शविली. त्यांच्या आगमनाने बेल्जियम खेळाडूंमध्ये उत्साह संचारला होता. त्याच्या जोरावच त्यांनी दिग्गज रशियाला 1-0 अशी मात देवून बाद फेरीत प्रवेश्ा केला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, बेल्जियमच्या राजा-राणीचे छायाचित्रे...