आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीकडून आर्मेनियाचा धुव्वा; ब्राझील विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओ पावलो - फिफाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यास मोजकेच दिवस उरले आहेत. या स्पर्धेच्या तयारीला सर्वच संघ लागले आहेत. यासाठी सुरू असलेल्या सराव सामन्यात जर्मनी, ब्राझीलने विजयाची नोंद केली.

जर्मनीने सराव सामन्यात आर्मेनिया टीमचा 6-1 ने धुव्वा उडवला. हा जर्मनीचा शेवटचा वॉर्मअप सामना होता. आंद्रे श्वरेल (52 मि.), लुकास पोडोलस्की (71 मि.), बेनेडिक्ट होवेडस (73 मि.), मिरोस्लाव क्लोस (76 मि.) व मारियो गोएजे (82, 89 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर र्जमनीने सामना जिंकला. आर्मेनियासाठी हेन्रिक खितार्यनने (69मि.) एकमेव गोल केला. दुसर्‍या हाफमध्ये र्जमनीने गोलचा धमाका उडवला.

सर्बियाचा पराभव
यजमान ब्राझीलने सराव सामन्यात सर्बियाचा 1-0 ने पराभव केला. पहिल्या हाफमध्ये यजमान टीमने घरच्या मैदानावर सुमार कामगिरी केली. मात्र, मध्यंतरानंतर फ्रेडने पुनरागमन केले. त्याने 57 व्या मिनिटाला गोल करून ब्राझीलचा विजय निश्चित केला. सर्बियाचे बरोबरी मिळवण्याचे प्रयत्न फसले.