रियो डी जनेरियो - ब्राझीलमध्ये फीफा विश्व चषकाबरोबरच फियोरेला कॅस्टिलो ही अर्जेंटिनाची मॉडेलसुध्दा चर्चेत आहे. आपल्या नजाकत सौंदर्याने आणि फुटबॉलप्रती आवडीमुळे तिचे नाव सगळीकडे घेतले जात आहे. आतापर्यंत फ्री स्टाईल फुटबॉलमध्ये 800 जणांना पराभूत करणा-या या मॉडेलची मेसीसोबत फुटबॉल खेळण्याची इच्छा आहे.
फियोरेलने 'इपानेमा बीच'वर आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. तिचे खेळातील कौशल्य पाहून भल्याभल्याची पाचावर धारण बसते. तर कित्येक जन तिच्याशी फुटबॉल खेळायला तगमगत आहेत. कॅस्टिलो फियोरेलने मेसीसोबत खेळण्याची इच्छा दर्शविली असून आपण मेसीला पराभूत करु शकतो असा दावाही केला आहे.
हातावर आहे 'ओम' च्या टॅटू
अर्जेंटिनाच्या या मॉडेलचे भारतासोबत काय कनेक्शन आहे हे अजून कळले नसले तरी तिच्या हातावर ओमचा टॅटू गोंदलेला आहे. हा टॅटू तिने आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर गोंदलेला आहे.
(फोटोओळ - फुटबॉल खेळताना फियोरेला)
पुढील स्लाइडवर बघा मॉडेल फियोरेला कॅस्टिलोची छायाचित्रे...