आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॉकआऊटसाठी खेळणार ब्राझील, कॅमरूनविरुद्ध आज लढत, नेमार, ऑस्करवर नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझिलिया - यजमान ब्राझीलचा संघ सोमवारी कॅमरूनवर विजय मिळवून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या नॉकआऊटमधील स्थान मजबूत करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. 4 गुणांसह ब्राझील ग्रुप ‘ए’मध्ये अव्वलस्थानी तर दोन्ही सामने गमावून कॅमरूनचा संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. कॅमरूनविरुद्धची लढत अनिर्णीत राहिली तरी ब्राझीलचे बाद फेरीतील स्थान पक्के आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 4 लढती झाल्या आहेत. यापैकी तीनमध्ये ब्राझीलने बाजी मारली आहे. सामन्यात नेमार व ऑस्कर यांच्यावर सर्वांचे लक्ष राहील.

तगड्या हॉलंडसमोर धोकादायक चिलीचे आव्हान
साओ पावलो २ सलामीच्या दोन्ही सामन्यांत दणदणीत विजय मिळवणारा हॉलंड आणि चिलीचा संघ सोमवारी ग्रुप ‘बी’च्या शेवटच्या लढतीत आमनेसामने असतील. दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण असून त्यांचे बाद फेरीतील स्थान निश्चित आहे. मागच्या सामन्यात पर्सीला दोनदा पिवळे कार्ड मिळाल्यामुळे तो चिलीविरुद्धच्या लढतीत खेळू शकणार नाही. मात्र, स्ट्रायकर अर्जेन रॉबेन आणि फॉरवर्डचा खेळाडू जर्मियाह लेन्स हे चिलीसाठी डोकदुखी ठरू शकतात. मिडफिल्डर चार्ल्स अ‍ॅरानगुईज आणि आर्टूरो विदाल यांची तंदुरुस्तीसुद्धा चिलीच्या चिंतेचे कारण आहे.

मेक्सिको-क्रोएशियावर प्री क्वार्टरमध्ये जाण्याचा दबाव
रेसिफे २ सोमवारी ग्रुप ‘ए’मध्ये मेक्सिको आणि क्रोएशिया यांच्यादरम्यान लढत होईल. या सामन्यात विजय मिळवून प्री क्वार्टर फेरीत प्रवेश मिळवणे हाच दोन्ही संघांचा उद्देश असणार आहे. या गटात मेक्सिकोचे 4 तर क्रोएशियाचे 3 गुण आहेत. निलंबनाची शिक्षा भोगून स्ट्रायकर मांडजूकिच पुन्हा क्रोएशियाच्या संघात परतणार आहे. दुसरीकडे गोलकिपर ओचोआ मेक्सिकोसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय. या सामन्यांत सर्वांचे त्याच्यावरच राहील. दोन्ही संघांदरम्यान यापूर्वी झालेल्या तीन लढतींपैकी दोनमध्ये क्रोएशिया आणि एकात मेक्सिकोने विजय मिळवला आहे.