साओ पावलो - पाठीचा कणा मोडल्यामुळे विश्वचषकातून बाहेर पडलेला ब्राझीलचा फॉरवर्डचा खेळाडू नेमारने ब्राझीलच हा विश्वचषक जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विश्वचषक जिंकण्याच्या माझ्या स्वप्नात अडथळा आला आहे. मात्र, तो अजून तुटला नाही. त्यामुळे माझे सहकारी हे स्वप्न पूर्ण करतील, असेही त्याने म्हटले आहे. शिवाय दु:खाच्या क्षणात साथ दिल्याबद्दल त्याने सहकारी खेळाडू तसेच प्रेक्षकांचे आभार मानले आहे.
ब्राझील फुटबॉल फेडरेशनकडून नेमारने व्यक्त केलेल्या भावनांचा व्हिडिओ जारी केला असून ब्राझीलमधील एका वाहिनीने त्याचे थेट प्रसारण केले. हा संदेश वाहिनीवरून कोट्यवधी लोकांनी पाहिला आणि नेमारला उभे राहून अभिवादन केले. सध्या नेमार साओ पावलोच्या त्याच्या घरी विश्रांती घेत आहे. जर वेदना कमी झाल्या तर मंगळवारी होणार्या सामन्यात नेमार मैदानात प्रेक्षक म्हणून उपस्थित राहू शकतो, असे त्यांनी त्याच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर ज्योस लुईज रंको यांनी म्हटले आहे. पुढील 45 दिवसांत नेमार पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.