बेलो होरिझोंटे - फिफा विश्वचषकाचे साखळी सामने संपले असून शनिवारपासून प्रेक्षकांना नॉकआऊटचा थरार पाहायला मिळणार आहे. यात जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेबाहेर पडेल. प्री क्वार्टर फायनलच्या पहिल्याच लढतीत यजमान व विजेतेपदाचा प्रबळ दावेदार ब्राझीलचा सामना ‘जायंट किलर’ चिलीशी होणार आहे, तर आजच्या दुसर्या लढतीत कोलंबिया आणि उरुग्वेदरम्यान लढत होईल.
स्ट्रायकर सांचेझ ब्राझीलसाठी धोकादायक
चिलीचा स्ट्रायकर ए. सांचेझने यंदाच्या विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली असून सध्या तो शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो ब्राझीलसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. नेमारने ब्राझील संघाच्या बचावफळीतील खेळाडूंना सांचेझपासून सतर्क राहण्यास सांगितले आहे.
संभाव्य संघ : ब्राझील : ज्युलियो सीझर, डॅनियल अॅल्वेस, थिआगो सिल्व्हा, डेव्हिड लुइस, मार्सेलो, फर्नाडिन्हो, ऑस्कर, लुइस गुस्ताव्हो, हल्क, फ्रेड आणि नेमार.
चिली : क्लाडिया ब्राव्हो, मोरिसियो इसला, गॅरी मेडेल, गोन्झालो जारा, युझेनियो मेना, चार्ल्स अॅरेंग्विझ, मार्सेलो डिआझ, फ्रान्सिको सिल्व्हा, अर्तुरो विडाल, अॅलेक्सिस सांचेझ आणि एडवर्डो व्हर्गास.
पुढील स्लाइडमध्ये, ब्राझीलचेच पारडे जड