आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brazil Won Opening Match Against Croatia,Divya Marathi

FIFA Word Cup: पहिल्या सामन्यात ब्राझीलचा कोएशियावर 3-1 ने विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओ पाऊलो - 20 व्या फीफा वर्ल्ड कपच्या ओपनिंग सामान्यात यजमान ब्राझीलने दमदार सुरूवात केली. ब्राझीलने तुलनेत कमी अनुभवी असणा-या क्रोएशियाला 3 - 1 ने पराभूत केले. ब्राझीलचा स्टार नेमारने पहिल्याच सामन्यात 2 गोल करून चाहत्यांचा उत्साह वाढवला. तर ऑस्करने एक गोल केला. क्रोएशियाच्या एका गोलचे श्रेयही ब्राझीललाच आहे. कारण त्यांच्या मार्सिलोकडून हा ओन गोल झाला.

पाच वेळा वर्ल्‍ड कप विजेता असलेल्या ब्राझीलविरूध्‍द क्रोशियाने दमदार सुरूवात केली होती. फर्स्ट हाफमध्ये 11 व्या मिनिटालाच मार्सिलोकडून बचाव करत असताना ओन गोल झाला. त्यामुळे क्रोएशियाला 1-0 ने आघाडी मिळाली.

फॉर्ममध्‍ये आला नेमार
क्रोएशियाने केलेल्या पहिल्याच गोलमुळे ब्राझीलच्या खेळाडुंवर दबाव आला होता. पण त्यांनी अत्यंत वेगाने आक्रमण केले. हाती आलेली एकही संधी दवडायची नाही, हे ठरवून ठरावीक अंतराने गोलचे प्रयत्न सुरू होते. अखेर नेमारला प्रयत्नात यश आले आणि त्याने 29 मिनिटाला गोल करून सामन्यात बरोबर केली. हा गोल होताच ब्राझीलच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला व एकच जल्लोष सुरू झाला. त्यानंतर ब्राझीलने सामन्यावरील पकड कमी होऊ दिली नाही. नेमारला मिळालेल्या पेनाल्टी शूट आऊटच्या संधीचेही त्याने सोने केले व ब्राझीलच्या आणि नेमारच्या खात्यात दुसरा गोल आला. त्यानंतर ऑस्करने केलेल्या तिस-या गोलने ब्राझीलचे विजयावर शिक्कामोर्तब झाले.
स्पेन विरुद्ध हॉलंडची टक्कर

रात्री 12.30 वाजेपासून
सॅल्व्हाडोर: विश्वचषकात शुक्रवारी स्पेन विरुद्ध हॉलंड या दिग्गज संघांदरम्यान सामना रंगेल. 2010 मध्ये हॉलंडला हरवून स्पेन विश्वविजेता ठरला होता. साखळीतील पहिल्या सामन्यात गतवेळचे फायनलिस्ट संघांची झुंजण्याची ही पहिलीच वेळ असेल.

समोरासमोर: स्पेन-5, हॉलंड-1, ड्रॉ-1

स्पेन: रँकिंग 1
विश्वविजेतेपद- 01
०यंदाच्या किताबाचा दावेदार. गेल्या सहा वर्षांत एक विश्वचषक, दोन युरो कप जिंकले. छोट्या-छोट्या चढाया करण्यात हा संघ चांगलाच तरबेज आहे.

स्टार वॉच: डेव्हिड विला
खेळाडू आपला 97 वा सामना खेळेल. त्याने स्पेनसाठी सर्वाधिक 56 गोल केलेले आहेत. सराव सामन्यात दोन गोल करून फॉर्मात असल्याचे संकेत दिले.

हॉलंड: रँकिंग 15
पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न
०डच संघ विजेतेपदाचा दावेदार
नसला तरी कोणत्याही संघाला हरवण्यात सक्षम आहे. तेजतर्रार फॉरवर्ड हे संघाचे बलस्थान आहे.

स्टार वॉच: वेस्ले स्नायडर
आपल्या 100 वा सामना खेळणार. डच आक्रमणाची धुरा त्याच्या खांद्यावर असेल. गेल्या विश्वचषकात सर्वाधिक चार सामन्यांत हा खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता.

यांच्याही आज लढती
मेक्सिको-कॅमेरून (रात्री 9.30 वा.)
चिली-ऑस्ट्रेलिया (पहाटे 3.30 वा.)
पुढे क्लिक करा आणि पाहा सामान्याची छायाचित्रे