आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA विश्वचषकातून नेमार बाहेर, सेमी फायनलमध्ये ब्राझीलचा मुकाबला जर्मनीशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टालेजा - ब्राझीलने टीम स्पिरीटच्या जोरावर शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुसर्‍या उपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाचा 2-1 ने पराभव केला. या वियजासह ब्राझीलने 20 व्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. आता त्यांची लढत जर्मनीसोबत होणार आहे. मात्र, या विजयाच्या आनंदासोबत ब्राझीलसाठी वाईट बातमी देखील आहे. कोलंबियाविरुद्धच्या लढतीदरम्यान ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार जायबंदी झाला आहे.
ब्राझीलला दुहेरी फटका
क्वॉर्टर फायनलपर्यंतचा शानदार प्रवास करणार्‍या ब्राझीलला शुक्रवारी दुहेरी फटका बसला. त्यांच्या स्टार फॉरवर्ड नेमार जखमी होऊन विश्वचषकातून बाहेर पडला तर, कर्णधार थियागो सिल्व्हाला दुसर्‍यांदा पिवळे कार्ड दाखवले गेले. प्रथम मॅक्सिकोविरुद्ध त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते. त्यामुळे सेमीफायनलमध्ये आता थियागो खेळू शकणार नाही. ब्राझीलचे दोन स्टार खेळू शकणार नसल्याने सेमीफायनलमध्ये यजमान ब्राझीलच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या आहेत. कोलंबियाचा येपेस याच्या धडकने नेमार खाली कोसळला आणि त्याच्या पाठीला जोरदार मार लागला आहे.

छायाचित्र - पाठीचे हाड दुखावल्याने वेदनेने किंचाळताना नेमार