आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉलने बेघर केले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - ब्राझीलमध्ये फुटबॉल विश्वचषकाची तयारी सुरू होताच किमान दहा लाख लोक गोळा होतील, असा अंदाज बांधला गेला. आता अर्धी स्पर्धा संपली असून सहा लाखांहून जास्त चाहते आले आहेत. अंदाज खरा ठरल्यामुळे हॉटेलचालकांना आनंदच झाला. फिफानेही अहवाल जारी केला असून प्रचंड तिकीट विक्री झाल्याचे आणि बाहेरून लोक आल्याचे म्हटले आहे. मात्र, हॉटेलचालकांचा आताचा सूर वेगळाच आहे. अपेक्षित लोक आले नसल्याचे ते सांगतात. खोल्या रिकाम्याच असल्याचे दाखवतात. गर्दीचा अंदाज ध्यानी घेऊन या मंडळींनी दरही वाढवले होते, जे आता कमी करावे लागत आहेत. लोक आले तर मग गेले कुठे, हे आता रहस्य बनून राहिले आहे.

हॉटेलांत मुक्कामाला थांबले नाहीत तर मग काय त्यांनी रात्र रस्त्यावरच काढली? रात्रीची भीती संध्याकाळ झाली की मुक्कामाला येते. मग कुणी अख्खी रात्र कसा काय बाहेर काढू शकेल? या रहस्याचा आता उलगडा होत आहे. लोक तर आले, मात्र हॉटेलांत न थांबता फ्लॅट किंवा घरांमध्ये मुक्काम करणे त्यांनी पसंत केले. त्याचे झाले असे की, थोड्याफार सोयी-सुविधा देऊन लोकांनी एका महिन्यासाठी घरे भाड्याने दिली. दोन खोल्यांच्या फ्लॅटमधून एका महिन्यात एक ते दीड लाखाच्या कमाईची सुवर्णसंधी कोण दवडेल? काही लोकांनी तर आपले कुटुंब छोट्या शहरांत हलवले किंवा नातेवाइकांकडे पाठवले. मी ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो त्याची मालकीण मैत्रिणीबरोबर तिच्या होस्टेलच्या खोलीत राहतेय. मैत्रिणीला दहा हजार रुपये दिले तरी चालतील. कारण वर्षभराचा खर्च एका महिन्यातच निघेल, असे तिचे रास्त म्हणणे आहे. मग लोक हॉटेलांकडे का फिरकतील? हॉटेलचालकांचा धंदा तर मार खाणारच आहे.