फुटबॉलला जेथे धर्म मानल्या जातो अशा दिग्गज महान फुटबॉलपटू पेलेच्या देशातील फुटबॉलवेडी माणसे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अलेक्झांडर टोलेडो आहे. 17 वर्षोपूर्वी एका अपघातामध्ये एक पाय गमावल्यावरही हा खेळाडू एका पायावर फुटबॉल खेळतो.
1996 मध्ये टोलेडो ब्राझीलमधील समुद्रकिनारी सुट्या साज-या करायला गेला असता एका मोटारसायकल अपघात त्याला एक पाय गमवावा लागला होता.
टोलेडो म्हणतो की, 'माझ्या मनामध्ये नेहमीच उत्साह असतो, खेळासाठी बळकट शरीर असून चालत नाही तर मन बळकट असायला हवे'. 36 वर्षीय टोलेडो मोलेक त्रावेसो संघाचा गोलकीपर आहे. प्रत्येक शनिवारी होत असलेल्या सामन्यामध्ये टोलेडो आपल्या मुलाला सोबत घेवून येतो. टोलेडोला जगभरासमोर आणणार फोटोग्राफर नॅको डोस याच्या मते- टोलेडो स्वत:चे अधूरे राहिलेले स्वप्न मुलामध्ये पाहतो.
पुढील स्लाइडवर पाहा, टोलेडोची छायाचित्रे...