रेसिफे - 20 व्या फीफा वर्ल्डकपमधील ग्रुप 'डी' मध्ये पहिल्या सामन्यामध्ये जोरदार विजयी मुसंडी मारणा-या इटलीने कोस्टारिकासमोर गुडघे टेकवले.
इटलीचा स्टार फुटबॉलपटू बालोटेली पूर्णता फ्लॉप ठरला. कोस्टारिकाने इटलीला 1-0 ने मात दिली. कोस्टारिकाने 24 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये दुस-या फेरीमध्ये प्रवेश स्थान निश्चित केले आहे. यावर्षी कोस्टारिकाने विश्व मानांकनामधील टॉप 10 मधील देश (इटली आणि उरुग्वे) ला पराभूत केले आहे.
शानदार पदार्पन
कोस्टारिकाने उरुग्वेला पराभूत करुन फीफा वर्ल्डकपमध्ये झोकात पदार्पन केले होते. उरुग्वेवर त्यांनी 3-1 ने विजय प्राप्त केला होता. हीच विजयी घौडदौड कायम ठेवत त्यांनी इटलीही धूळीस मिळविले आहे.
सामन्यातील एकमेव गोल
ब्रायन रुइझने (44 मि.) केलेल्या एकमेव गोलच्या बळावर कोस्टारिकाने रंगतदार सामन्यात विजय मिळवला. तत्पूर्वी कोस्टारिकाच्या कॅम्पबेला गोलपोस्टच्या जवळच इटालीयन खेळाडूने ढकलले होते. परंतू पंचांनी कोस्टारिकाला पेनल्टीची संधी दिली नाही.
पुढील लढत इंग्लडशी
कोस्टारिकाचा स्पर्धेतील तिसरा सामना इंग्लंडशी होईल. अशीच विजयी कामगिरी करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. हा सामन्यात कोस्टारिकाला विजयाच्या हॅट्रिकची संधी असेल.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची छायाचित्रे...