आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Days Before World Cup, Much Of Brazil Just Not In The Mood

फिफा वर्ल्डकप : यजमान ब्राझीलचा दावा अधिक मजबूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या 12 जूनपासून सुरू होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत किताब जिंकण्याचा यजमान ब्राझील टीमचा दावा अधिक मजबूत आहे. पिवळ्या रंगाचा टी-शर्ट (जर्सी) घालून मैदानावर उतरणार्‍या ब्राझील संघाच्या खेळाडूंनी आतापर्यंत पाच वेळा वर्ल्डकप जिंकण्याची किमया साधली आहे. यंदाही बाजी मारून अजिंक्यपदाचा षटकार मारण्याचा बलाढ्य ब्राझील टीमचा प्रयत्न असेल. यजमान टीमकडे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. या टीमकडे स्टार खेळाडूंची कमी नाही. आक्रमणाची शैली हीच ब्राझील टीमचे पॉवरहाऊस मानले जाते.

टीमची ताकद
मागील काही दिवसांपासून ब्राझीलला जबरदस्त आक्रमण करणारा संघ म्हणून ओळखले जात आहे. या टीममध्ये चेल्सीचा ऑस्कर आणि बार्सिलोनाच्या नेमारचा समावेश आहे. हे खेळाडू आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर ब्राझीलचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित करू शकतात. याशिवाय ब्राझील टीममध्ये काही दक्षिण अमेरिकी ट्विस्टदेखील आहे, जे गत काही वर्षांपासून ब्राझीलकडून खेळत आहेत. तसेच लुईज गुस्तावो, डेव्हिड लुइज व थियागो सिल्वादेखील कामगिरी करण्यात माहीर आहेत. त्यामुळेच ब्राझीलला बलाढ्य टीम म्हणून ओळख मिळाली आहे.

दुबळी बाजू
ब्राझील टीमकडे आऊट स्ट्रायकर नाहीत. यालाच फुटबॉल टर्ममध्ये नंबर 9 म्हटले जाते. याशिवाय यजमान टीमला आपल्या मजबूत डिफेन्सला सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी या टीमला चमकदार कामगिरी करण्याची आवश्यकता आहे.

नेमारवर असेल मदार
ब्राझील टीमचा 22 वर्षीय युवा स्ट्रायकर नेमारने आपल्या शेवटच्या 16 सामन्यांत शानदार 13 गोल केले आहेत. यासह त्याने आपल्या प्रतिभावंत खेळाची प्रचिती आणून दिली. तसेच नेमारवर सध्या माध्यमांचीही खास नजर आहे. उत्साहाने परिपूर्ण असलेल्या नेमारमध्ये संकटात वेगाने चेंडू पास करण्याचीही क्षमता आहे. त्यामुळेच त्याच्याकडून यंंदाच्या वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरीची आशा केली जाते.