नताल- 20 व्या फुटबॉल वर्ल्डकपच्या ग्रुप-डीच्या एका रोमांचक सामन्यात उरूग्वेने गतविजेत्या इटलीचा 1-0 ने पराभव करत बादफेरीत आपली जागा निश्चित केली आहे.
विजेत्या संघाकडून एकुलता एक गोल कर्णधार डिएगो गोडिन याने केला. इटलीला पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी केवळ एका ड्रॉची गरज होती, तर उरूग्वेला अंतिम-16 मध्ये जागा मिळवण्यासाठी या विजयाची गरज होती, आणि त्यांना यात चांगलेच यश मिळाले.
चारवेळा चॅम्पियन ठरलेल्या इटलीला याप्रकारे मागच्या चार वर्षात दुसऱ्यांदा बाहेर पडावे लागले आहे. या सामन्यात उरूग्वेचा स्ट्राइकर सुआरेजने विरोधी संघातील खेळाडूचा चावा घेतल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. ही घटना गोडिनच्या गोलच्या एक मिनिट आधी घडली होती.
गोडीन बनला स्टार
उरूग्वेचा कर्णधार गोडीनचा निर्धारित वेळेपेक्षा 9 मिनिटे आधी कॉर्नरवरून झालेल्या गोलमुळे या दक्षिण अमेरिकी देशाला बढत मिळाली. कॉर्नरचा शॉट गोडीनच्या खांद्याला लागून गोलपोस्टमध्ये गेला आणि इटलीचा गोलकीपर जियानलुईगी बुफोन काहीच करू शकला नाही.
इंग्लंड ठरला ग्रुप-डी मध्ये सगळ्यात पिछाडीवर
उरूग्वे ग्रुप-डीमध्ये 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून तो या पुढच्या फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. दुसरीकडे कोस्टारिकाच्या संघाने इंग्लंडच्या संघाने गोलरहित ड्रॉ सामना खेळून 1 गुण मिळवला आणि संघ तीनही सामन्यात 7 गुणांनी ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर आला. इंग्लंड 1 गुणासह सगळ्यात मागे आहे.
क्लॉडियोचं रेड कार्ड, इटलीचे झाले नुकसान
59व्या मिनिटाला मिडफिल्डर क्लॉडियो मार्चिसियोला इगिडियो अरेवालोच्या गुडघ्यावर पाय देऊन पाडण्यासाठी रेड कार्ड दाखवण्यात आले होते. यामुळे 59 व्या मिनिटाला इटलीच्या संघात केवळ 10 खेळाडू उरले. उरूग्वेचा स्टार स्ट्राइकर सुआरेजने विरोधी संघातल्या खेळाडूचा चावा घेतल्याचे सिद्ध झाल्याने तो पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन्ही संघाच्या गोलकीपरने केला शानदार बचाव
सामन्यात दोन्ही संघांनी सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता, परंतू या उरूग्वेने बाजी मारली. इटलीचा गोलकीपर बुफोन ने शानदार बचाव केला पण आपल्या संघाला वाचवण्यात तो अयशस्वी ठरला. बुफोनने सातव्या मिनिटाला फ्री किकवर सुआरेजच्या शॉटचा चांगला प्रतिकार केला. उरुग्वेचा गोलकीपर फर्नांडो मुसलेरानेदेखील 12व्या मिनटाला आंद्रिया पिलरेच्या फ्री किकला थांबवले.
निर्णायक ठरला कर्णधार डिएगोचा गोल
सुआरेजने पुन्हा एकदा 33 व्या मिनिटाला एक चांगला प्रयत्न केला, जो बुफोनने गोलमध्ये रूपांतरित होण्यापासून थांबवले. मारियो बालोटेलीला12व्या मिनिटाला मिडफिल्डर अलवारो परेराचा फाऊल केल्यामुळे यलो कार्ड दाखवण्यात आलं. 81व्या मिनिटाला सामन्यातला एकमेव गोल कर्णधार डिएगोने केला. हा सामन्यातला निर्णायक गोल ठरला.
दिवसातील इतर सामन्यांचा निकाल
युनान(ग्रीस)ने आपल्या अंतिम सामन्यात आयव्हरी कोस्टला 2-1 ने पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. विजेत्या संघाकडून आंद्रेस समारिस आणि जॉर्जियस समरेस
ने एक-एक गोल केला. पराभूत संघाकडून झालेला एकमेव गोल विलफ्रेड बॉनीच्या नावावर आहे.
कोस्टारिकाने आपल्या सुरूवातीच्या दोन सामन्यात इटली आणि उरुग्वेसारख्या संघांना हरवल्यानंतर शेवटच्या सामन्यात जोरदार प्रदर्शन केले. त्याच्या खेळाडूंनी गतविजेत्या संघाला कुठल्याही गोल ड्रॉशिवाय बाहेरचा रस्ता दाखवला. इंग्लंडने आपला स्टार खेळाडू वेन रूनीला संघाबाहेर ठेवले होते.
ग्रूप-सीच्या एका सामन्यात कोलंबियाने जोरदार प्रदर्शन करून जपानचा 4-1 ने पराभव केला. या विजयासह कोलंबियाने बादफेरीत आपली जागा सुनिश्चित केली आहे. विजेत्या संघाकडून जॅक्सन मार्टीनेंजने दोन गोल केले, तर जुआन कौड्रेडो आणि जेम्स रोड्रिगुइज ने एक-एक गोल केला.
(फोटो ओळ - इटलीच्या विरोधात रोमांचक विजय मिळवल्यानंतर आनंद साजरा करताना उरूग्वेचे खेळाडू)
पुढच्या स्लाइड्सवर पहा, सामन्याची काही निवडक फोटोज