रियो डि जेनेरियो - ब्राझीलमधील प्रमुख शहर रियो डि जेनेरियोमध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आतापर्यंतची ब्राझीलच्या इतिहासातील सर्वांत चोख व्यवस्था यावेळी ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणावरून ब्रिटन टीम ब्राझीलच्या सैनिकी तळावर राहत आहे. त्यांनी गेल्या शनिवारी इटली विरुध्द होणा-या सामन्यांची जोरदार तयारी या तळावर केली होती.
कोपाकाबाना तट हे अत्यंत सुरक्षित मानले जाते. हा अत्यंत नयनरम्य फोटो सिंगापुरचा युवा फोटोग्राफर वांग मेय ने कॅमे-यात टिपला आहे.
ब्राझीलमध्ये फुटबॉल संघांसाठी विशेष सुरक्षा तैणात केली आहे. विमानतळार उतरताच सुरक्षारक्षकांच्या चोख बंदोबस्तात सर्व खेळाडूंना त्यांच्या निवास्थानापर्यंत पोहाचवण्यात आले आहे. ब्रिटनचा संघ समुद्र किना-यावर वसलेल्या गोल्डन टूलिप हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे.
(फोटो ओळ - रियो डि जेनेरियो जवळच असलेल्या कोपाकॅबाना बीच वरील सैनिकी तळ)