आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • English Footballer David Beckham And Victoria Latest News In Marathi,Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉलपटू बेकहॅमच्या पत्नीचा अनोखा \'लकी चार्म\', बाथरुममध्ये ठेवते गुलाबी दगड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी ब्रिटीश फुटबॉलपटू डेव्हीड बेकहॅमची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम आपल्या फॅशन क्रिएशन्ससाठी प्रसिद्ध आहे. तिचे लकी चार्म तिला कशाप्रकारे यशस्वी होण्यास मदत करतात हे तिने सांगितले. एखाद्याला तिचे हे लकी चार्म विचित्र आणि खोटे वाटतील, परंतू तिच्या मते हाच खरा तिच्या यशाचा मंत्र आहे.
नुकत्याच सिंगापूर येथील एका कॉलेजात तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तिने सांगितले की, आपल्या फॅशन शोच्या वेळी ती स्टेजच्या मागे क्रिस्टल्स ठेवते. यामुळे तिच्या शोला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळते.
बाथरूममध्ये ठेवते गुलाबी दगड
तिने सांगितले की, ती लॉस एंजिलिसला राहात असताना , आपल्या बाथरूममध्ये काळ्या आणि गुलाबी रंगाचे दगड ठेवायची. यामुळे घरात येणाऱ्या नकारात्मक शक्ती बाहेर निघून जातात. तसंच घरात राहणाऱ्या लोकांच्या विचारांत सकारात्मक परिवर्तन येते. तिला हे सांगताना कसलाही संकोच वाटत नाही की, आपल्या वाईट नशीबापासून सुटका मिळवण्यासाठी नीलकंठ दिसला की त्याला पाहून नमस्कार करते.
मुलेही झाली आकर्षित
व्हिक्टोरियाने आपल्या नुकत्याच 'व्हीबी ड्रेसेस'च्या मिळालेल्या यशाचं श्रेय आपल्या लकी चार्म्सला दिलं आहे. तिने सांगितले की जेव्हा तिची 3 मुलं तिच्या कार्यक्रमाला आली होती तेव्हा तेसुद्धा हा सगळा प्रकार पाहून अचंबित झाले. फक्त व्हिक्टोरियाच नाही तर मॅडोना, केट पेरी, अँजेलिना जोली सहित अनेक सेलिब्रिटीज यावर विश्वास ठेवतात.
पहिल्या डेटसाठी घातलेल्या ड्रेसचा फो़टो केला पोस्ट
डेव्हीड आणि व्हिक्टोरिया 17 वर्ष जूने प्रेमप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नुकताच व्हिक्टोरियाने आपल्या एका ड्रेसचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे जो तिने डेव्हीडसोबत पहिल्या डेटवर जाताना घातला होता. नारंगी रंगाच्या या शॉर्ट ड्रेसला आतापर्यंत 5000 रिट्वीट्स मिळाले आहेत. डेव्हीड आणि व्हिक्टोरियाची ओळख 1997 साली मँचेस्टर येथे झालेल्या एका चॅरिटी फुटबॉल सामन्यात झाली होती. पहिल्याच भेटीत त्याला व्हिक्टोरिया आवडली होती.
(फोटो ओळ - एका कार्यक्रमाच्यावेळी डेव्हीड बेकहॅम आपली पत्नी व्हिक्टोरियासोबत)
पुढच्या स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डेव्हीड आणि व्हिक्टोरियाचे निवडक छायाचित्रे