आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA 2014 WC Uruguay Colombia Match, Uruguay's Star Suarez Banned

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उरुग्वेपुढे कोलंबियाचे तगडे आव्हान, सुआरेझ बाहेर झाल्याने उरुग्वेची अडचण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - नॉकआऊट फेरीच्या अन्य एका लढतीत उरुग्वेसमोर कोलंबियाचे आव्हान असणार आहे. या सामन्यात कोलंबियाचे पारडे जड असून त्याने ग्रुप ‘सी’ च्या साखळीतील तीनही सामन्यांत विजय मिळवला आहे. उरुग्वेच्या संघाने ग्रुप ‘डी’मध्ये दोन सामन्यांत विजय प्राप्त केला आहे. दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत 11 लढती झाल्या असून त्यापैकी 9 सामने अनिर्णीत राहिले आहेत. उरुग्वेचा संघ आतापर्यंत विश्वचषकात स्ट्रायकर लुइस सुआरेझवर अवलंबून होता. दुखापतीतून सावरूनही त्याने दोन सामन्यांत चार गोल केले होते. मात्र, मागच्या लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खांद्याला चावा घेतल्याने फिफाने त्यावर 9 सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे तो विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्याच्याशिवायही सामना जिंकता येऊ शकतो, हे उरुग्वेला या सामन्यात सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.

दोन्ही संघातील संभाव्य खेळाडू
कोलंबिया : डेव्हिड ओस्पिना, क्रिस्टियन जपाता, मारियो येपेस, कार्लोस सांचेझ, जुआन जुनिगा, पाब्लो अर्मेरो, अ‍ॅबेल अ‍ॅग्विलर, जुआन कुआडराडो, विक्टर इबार्बो, टिओफिलो गुटिरेज आणि जॅक्सन मार्टिनेझ.

उरुग्वे : फर्नांडो मुस्लेरा, मार्टिन काकेरस, दिएगो लुगानो, दिएगो गोडीन, मॅक्सिमिलिआनो परेरा, अल्वारो गोंजालेज, अ‍ॅग्डियो अरेवालो रिओस, क्रिस्टियन रोड्रिग्ज, निकोलस लोडिरो, दिएगो फोरलान आणि अ‍ॅडिनसन कवानी.