आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA Cup News In Marathi, Costarica, Divya Marathi, England

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोस्टारिकाची इटलीवर मात, कोस्टारिका 24 वर्षांनंतर प्री-क्वार्टर फायनलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्टालेजा - कोस्टारिकाने तब्बल 24 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. या संघाने डी ग्रुपमध्ये शुक्रवारी रात्री माजी चॅम्पियन इटलीचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. ब्रायन रुइझने (44 मि.) केलेल्या एकमेव गोलच्या बळावर कोस्टारिकाने रंगतदार सामन्यात विजय मिळवला. कोस्टारिकाचा स्पर्धेतील तिसरा सामना इंग्लंडशी होईल. यात विजयी हॅट्ट्रिकचा कोस्टारिकाचा प्रयत्न असेल.
यासह कोस्टारिकाने स्पर्धेत सलग दुस-या विजयाची नोंद केली. या संघाचे सहा गुण झाले आहेत. यासह कोस्टारिकाने अव्वल स्थान मजबूत केले. तसेच इटलीचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिला पराभव ठरला. आता इटलीचे तीन गुण आहेत. इटलीने गोलसाठी केलेले 11 प्रयत्न या वेळी अपयशी ठरले. आता इटलीचा सामना मंगळवारी उरुग्वेशी होईल.

स्कोअर बोर्ड
इटली कोस्टारिका
0 गोल 1
11 गोलसाठी प्रयत्न 10
10 फाउल्स 24
01 येलो कार्ड 01