यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या एकूण 20 सामन्यांत 60 गोल झाले आहेत. प्रत्येक सामन्यात सरासरी 3.14 गोलच्या सरासरीने दर अर्ध्या तासाला यातील एक गोल झाला आहे. 1958 नंतर प्रथमच अशी सरासरी दिसली आहे. त्या वेळी 3.6च्या सरासरीने 126 गोल झाले होते. मागच्या विश्वचषकात ही सरासरी 1.64 इतकी होती.
फुटबॉलमध्ये आक्रमकता वाढली
फुटबॉलमध्ये सध्या खेळत असलेल्या प्रत्येक संघात उत्कृष्ट फॉरवर्ड-मिडफील्डरचा समावेश आहे. परंतु काही संघांत बचाव फळीचा अभाव दिसून येतो. 2007 तील एका सर्व्हेनुसार टॉप-30 फुटबॉलर्सपैकी 10 डिफेंडर होते. 2014 मध्ये ही संख्या टॉप-30 मध्ये 4 यावर जाऊन पोहोचली. त्यामुळे आता गोल होण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे. युरोपच्या क्लब फुटबॉलमधील विश्लेषणातही आक्रमकता आणि गोल वाढीचे संकेत देण्यात आले आहेत.
सरासरी गोल
स्पर्धा 2006-10 2010-14
प्रीमियर लीग 2.58 2.79
ला लिगा 2.67 2.78
बुंदेसलिगा 2.58 2.96
सीरी ए 2.58 2.61
पुढे वाचा...