आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA WC : अंतिम टप्प्यासाठी जगभरात चाहत्यांच्या उत्साहाला उधाण, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझिलमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातील अंतिम चार संघांची नावे निश्चित झाली असल्याने चाहत्यांचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. त्यात ब्राझिल आणि अर्जेंटिना या संघांचा या चारमध्ये समावेश असल्याने चाहत्यांनी अक्षरशः जग डोक्यावर घेतले आहे. सध्या ब्राझीलसह या चारही देशांमध्येही चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यात सुरुवात केली आहे. काही चाहते आपल्या देशाला विजेतेपद मिळावे म्हणून देवाला साकडे घालत आहेत, तर काहींनी आतापासूनच विजयोत्सवाला सुरुवातही केली आहे. त्याचबरोबर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या देशांच्या चाहतेही इथपर्यंत पोहोचल्याच्या निमित्ताने जल्लोष करत आहेत. पाहुयात चाहत्यांच्या अशाच जल्लोषाची 38 छायाचित्रे,..
फोटो - अर्जेंटिनाचा विजय व्हावा यासाठी एका प्रेक्षकाने नदीच्या प्रवाहात उतरून प्रार्थना केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा चाहत्यांची अशीच काही छायाचित्रे....