टूर्नामेंटमधून आधीच बाहेर झालेल्या बोस्निया- हर्जेगोविनाने ग्रुप-'एफ' मध्ये इराणवर 3-1 ने विजय मिळवून स्पर्धेतील शेवट सुखद केला. परंतु यामुळे आशियाई संघाचं वर्ल्डकप फुटबॉलच्या बादफेरीत पोहोचण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं आहे.
बोस्नियाकडून एडिन जेको(23 व्या मिनिटाला), मिरालेम पिजानिक (59 व्या मिनिटाला) आणि अवदिजा वर्साजेविच(83 व्या मिनिटाला) गोल केले. इराणकडून गुचानजाद याने 82व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
बोस्नियाचा आक्रमक खेळ पडला इराणवर भारी
इराणने नायजेरियाकडून गोलरहित ड्रॉ खेळला होता, तर दुसरीकडे अर्जेंटिनाकडून त्याला 2-1 ने हार पत्करावी लागली होती. त्यामुळे पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना एक सामना जिंकण्याची आवश्यकता होती. परंतू इराणने बचावात्मक पवित्रा घेतला जो त्यांना चांगलाच भोवला. दुसरीकडे अर्जेंटिना आणि नायजेरियाकडून पराभव झाल्यानंतर बोस्नियाकडे गमावण्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांनी सामन्यात आक्रमक पवित्रा घेतला.
जेकोनं उघडलं खातं
जेकोनं सामन्यात 23 व्या मिनिटाला गोल करत बोस्नियाला बढत देऊन इराणच्या संघात खळबळीचं वातावरण निर्माण केलं. त्याने 20 फुटाच्या अंतरावरून शॉट तयार करून गोलमध्ये टाकला. इराणनेदेखील आक्रमक प्रतिकार केला, परंतू मसूद शोजाईचा जोरदार शॉट बोस्नियाच्या क्रॉसबारला धडकला. इराणने याआधीच्या सामन्यातदेखील बचावात्मक पवित्रा घेतला आणि त्याने अधिकतर आक्रमक प्रत्युत्तरच दिले. ह्याच कारणामुळे बॉल त्यांच्या भागातच फिरत राहिला. इराणने सामन्याच्या दुसऱ्या भागात मात्र नक्कीच आक्रमक प्रदर्शन केलं
( फोटोओळ - बॉलसाठी झटताना इराणचा पेजमन (डावीकडून) आणि बोस्नियाचा वेदाद)