आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA WC 2014: England Draw 0 0 Against Costa Rica Group D Soccer Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC: इंग्लंड-कोस्टारिका लढत 0-0 ने ड्रॉ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होरिझोंटे - नॉकआऊटमधून आधीच बाहेर पडलेल्या इंग्लंडच्या संघाची मंगळवारी कोस्टारिकाविरुद्ध झालेली लढत 0-0 ने अनिर्णीत ठरली. यासोबतच इंग्लंडचा संघ एकही सामना न जिंकता विश्वचषकातून बाहेर पडला. कोस्टारिकाने ग्रुप ‘डी’ मध्ये सात गुणांसह तर उरुग्वेने सहा गुणांसह प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. या ग्रुपला ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हटले जात होते आणि इंग्लंड बाहेर पडल्याने ते सिद्धही झाले. या सामन्यात इंग्लंडच्या प्रशिक्षकाने वायने रुनी आणि युवा स्टार स्टर्लिंगला विर्शांती दिली होती. कोस्टारिकाचा गोलकीपर केलार नवासला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.

चौथा गोलरहित ड्रॉ
कोस्टारिका आणि इंग्लंडदरम्यान खेळली गेलेली ही लढत यंदाच्या विश्वचषकातील चौथी गोलरहित (0-0) अनिर्णीत ठरली. यापूर्वी नायजेरिया-इराण, ब्राझील-मेक्सिको, जपान-ग्रीसदरम्यानची लढत अनिर्णीत राहिली होती.