आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉलप्रेमींची रंगछटा; चेहरे रंगवून सामने पाहिले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ - ‘इच्छा तेथे मार्ग’ असे म्हणतात ते उगीच नाही. त्यासाठी हवी फक्त जिद्द. ही गोष्ट आहे अर्जेंटिनाच्या जॉन मर्किम या अवलियाची. जॉन चित्रकार आहे. फुटबॉल त्याचा जीव की प्राण. ही कलाकारीच आता त्याच्या फुटबॉलप्रेमात गहिरे रंग भरत आहे. 26 वर्षीय जॉन सांगतो, एकदा तरी वर्ल्डकप बघायचा ही इच्छा होती. पण चित्रकलेतून इतकी कमाई नव्हती. त्यामुळे स्वप्न अधुरेच राहील अशी खंत होती. मात्र, एकाने सांगितले की भाड्याचे पैसे जमव, प्रत्यक्ष सामन्यावेळी बाकीची कमाई होतच राहील. जॉन पुढे सांगतो की, मोजक्या पैशानिशी विश्वचषकस्थळी दाखल झालो. साओ पावलोत सर्वप्रथम रंग घेऊन उभा राहिलो तर कुणीही फिरकेना. शेवटी उभ्याउभ्याच स्वत:चा चेहरा रंगवायला घेतला आणि चमत्कार झाला. तोबा गर्दी जमली. प्रत्येकालाच चेहरा रंगवायचा होता. एकाला विचारले, रंग लावायचाच आहे तर तुझ्या देशाचा झेंडाच चितारू का? तो तयार झाला आणि नशीबच पालटले. त्यानंतर मी झेंडा रंगवायचा विचार जरा बाजूला सारला. स्वत:च्या पद्धतीने चेहर्‍यावर रंग भरू लागलो. त्यामुळे वेगवेगळे रंग उधळू लागले. खरे तर यासाठी वेळही कमी लागतो आणि रंगही... चेहर्‍याला साजेसा रंग मात्र शोधून लावतो.

‘किती कमाई होते? एकाकडून किती पैसे घेतोस?’ मी विचारले... ‘जवळपास चार डॉलर.’ त्याने उत्तर दिले. मात्र, अर्जेंटिनाचा सामना असेल तर फक्त सामनाच पाहतो. अर्जेंटिनाच्या चाहत्यांकडून पैसे घेत नाही. रंग भरताना लोकांशी गप्पाही मारतो.