आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA WC 2014 : Lionel Messi Shine Argentina Win Over Nigeria

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेसीच्या ‘डबल’ने अर्जेंटीनाची ‘हॅट्ट्रिक’; चार गोल करून पोहोचले टॉपवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटरेअँलेग्रे- एस्तादियो बायरा रिओ मैदानात बुधवारी मेसीने पुन्हा एकदा चपळ खेळाचे प्रदर्शन करत आपल्या दोन शानदार गोलच्या भरवशावर अर्जेंटीनाला विजय मिळवून दिला. नायजेरियाविरुद्ध झालेल्या या लढतीत अर्जेंटीनाने 3-2 ने विजय मिळवत गटात अव्वल स्थान काबीज केले आणि पुढच्या फेरीत थाटात प्रवेश केला.

सामन्याच्या सुरुवातीच्या चार मिनिटांतच दोन गोल झालेला हा विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला सामना ठरला आहे. सामन्याच्या तिसर्‍याच मिनिटाला अर्जेंटीनाच्या मारियाने डाव्या बाजूने शानदार किक मारली. पण फुटबॉल गोलपोस्टला लागून मैदानात येऊन पडला. मात्र, डोळ्याचे पावते लवते न लवते तोच मेसीने रिबाउंडवर जबरदस्त किक मारत फुटबॉलला गोलपोस्टमध्ये ढकलले. मात्र, त्यानंतर अवघ्या एका मिनिटात नायजेरियाच्या अहमद मुसाने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर मेसीने इंज्युरी टाइममध्ये 90 फु टांवरून फ्री किक मारत अर्जेंटीनाला 2-1 ची आघाडी मिळाली. मात्र, मुसाने पुन्हा एकदा मुसंडी मारत सामना बरोबरीत आणून सोडला. सामन्याच्या 50 व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या रोजोने शानदार गोल करत सामना 3-2 वर नेऊन संघाला विजय मिळवून दिला.
(गोल केल्यानंतर चिरपरिचित अंदाजात मेसी, दुसरा गोल केल्यानंतर मेसीला अन्य खेळाडूंनी उचलून घेतले.)
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सामन्याची निवडक छायाचित्रे...