आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA WC 2014: Uruguay\'s Star Luis Suarez Bites Italy\'s Giorgio Chiellini, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: फुटबॉलपटूचे हिंस्‍त्र रूप, विरोधी टीमच्या खेळाडूचा घेतला चावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळ डेस्क: 20 व्या फिफा वर्ल्ड कप च्या ग्रूप- डी मध्ये इटली आणि उरूग्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान अशी घटना घडली ज्यामुळे खेळाच्या भावनेला धक्का लागला आहे. 19 जूनला इंग्लंडच्या विरोधात दोन गोल करून उरूग्वेच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला सुआरेज इटलीच्या चिलीनोच्या खांद्याला दाताने चावला. हे काही पहिल्यांदा नाही, याआधीदेखील 2013 साली तो चेल्सीच्या मिडफिल्डरला चावला होता.
विनिंग गोलच्या एक मिनिटआधी घडली घटना
59व्या मिनिटाला मिडफील्डर क्लॉडियो मार्चिसियो ला इगिडियो अरेवालोच्या गुडघ्यावर आपला बूट ठेवून पाडल्याने त्याला रेड कार्ड दाखवून त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले होते. त्यामुळे शेवटच्या मिनिटाला इटलीच्या टीममध्ये 10 च खेळाडू उरले. उरूग्वे चा स्टार स्ट्राइकर सुआरेज या घटनेमुळे धोक्यात येऊ शकतो. टीव्ही रिप्लेमध्ये तो इटलीचा डिफेंडर चिलीनोच्या खांद्यावर चावताना दिसला होता. ही घटना उरूग्वेचा गोल होण्याच्या एक मिनिट आधी घडली.
2013मध्‍ये चेल्सीच्या खेळाडूचादेखील घेतला होता चावा
सुआरेजला 2013च्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये चेल्सीची के ब्रानिस्लाव इवानोविचला चावल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. त्याला आपल्या करिअरमध्ये इतर खेळाडूंना चावल्यामुळे अनेकवेळा शिक्षा झाली आहे. चिलीनो मॅक्सिकोने टी-शर्ट काढून रेफरीला सुआरेजने खांद्यावर चावल्याच्या खुणा दाखवला.
अपराध सिद्ध झाल्यास होऊ शकते कारवाई
फिफाच्या अनुशासनात्मक समितीसमोर जर त्याचा अपराध सिद्ध झाला तर सुआरेजला स्पर्धेतून बाहेर जावे लागणार हे निश्चित आहे. त्याला मोठा काळ निलंबन सहन करावे लागू शकते. 2010च्या वर्ल्डकपमध्येदेखील तो विलन ठरला होता जेव्हा त्याने गोल लाईनवर मुद्दाम हात मध्ये घालुन शॉट थांबवला होता. त्यामुळे घाणाची टीम क्वार्टर फाइनलच्या विजयापासून वंचित राहिला होता.
24 सामनयांवर बॅन?
सुआरेज अपराधी सिद्ध झाल्यानंतर त्याच्या 24 आंतरराष्ट्रीय सामन्यांवर किंवा लाइफ टाइम बॅन येऊ शकतो. सामना संपल्यानंतरदेखील या प्रकरणात फिफाच्या अनुशासनात्मक समितीकडून काही जाहीर झालं नाहीये.
(फोटोओळ - सामन्यादरम्यान उरूग्वेचा फुटबॉलपटू सुआरेज(डावीकडे) ने इटलीचा चिलीनोचा चावा घेतला)
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडीओत सुआरेजचे हिंस्‍त्र रूप