2013 मध्ये लीव्हरपूल येथील इव्हानोविचला चावा घेण्याच्या घटनेनंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. टॉम फॅकेट यांनी ‘सुआरेज पुन्हा चावा घेईल’, अशी भविष्यवाणी केली होती. आयुष्यातील दुर्बलता हे यामागील कारण आहे, असे ते म्हणाले होते. गरीबीत 7 भावंडांमध्ये वाढलेल्या सुआरेझने कायमच अस्तित्वासाठी संघर्ष केला.
जन्म : 24 जानेवारी 1987
कुटुंब : वडील रुडोल्फो व्यवसायाने हमाल आणि आई सेंड्रा-गृहिणी. पत्नी सोफिया-गृहिणी. मुलगी- डेफिना, मुलगा-बेंजामिन.
लहानपणापासूनच हट्टी
वडिलांचे ऐकत नसे :
सुआरेझ सहा वर्षांचा होता तेव्हाच वडिलांच्या निर्णयाविरुद्ध कुटुंबासोबत राजधानी माँटेव्हिडिओला गेला नाही. महिनाभराने त्याला तेथे जावेच लागले.
वडिलांनी कुटुंब सोडले, लुइसने सर्वकाही :
लुइस 9 वर्षांचा असतानाच वडील आईपासून वेगळे झाले. सुआरेझवर याचा वाईट परिणाम झाला. त्याने फुटबॉल खेळणे सोडले. सर्वांनाच नकार देऊ लागला.
फुटबॉलऐवजी दारूचे व्यसन :
पुन्हा खेळू लागला, पण दारूच्या प्रचंड आहारी गेला होता.
गर्लफ्रेंडने नाकारल्यावर पुन्हा खेळ सोडला :
15 व्या वर्षीच सोफिया त्याच्या आयुष्यात आली. आयुष्याला वळण मिळाले. 2003 मध्ये ती त्याला सोडून बर्सिलोनाला गेली. दु:खी लुइसने पुन्हा फुटबॉल सोडले.
या शब्दांनी करिअर बदलले
‘लुइस, तुला अनेक वर्षे फुटबॉल खेळायचे असेल तर ही संधी कदापि गमावू नको. मला चुकीचा ठरवू नकोस.’ विल्यम पेरेज, अधिकारी, नेकिओनल, क्लब क्लबमध्ये खेळण्याची अखेरची संधी खूप मुश्किलीने मिळाली होती, तेव्हा सुआरेझला उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले होते.
स्वत:वरील उपचार सोडून आधी सुआरेझवर उपचार
कर्करोगग्रस्त फिजियो वॉल्टर फरेरा यांनी स्वत:वरील उपचार थांबवून वर्ल्डकपपूर्वी सुआरेझच्या उजव्या गुडघ्याची जखम बरी केली होती.
वयाच्या 15 व्या वर्षी तो प्रथम वादात सापडला. त्या सामन्यात त्याने रेफरीवर डोक्याने हल्ला करुन त्याचे नाक फोडले होते. फुटबॉल विश्वचषक सामन्यात लुइस सुआरेझने इटलीचा डिफेंडर जॉजिर्यो चिलिनीच्या खांद्याला चावा घेतला.
पुढील स्लाइडवर पाहा, छायाचित्रे...