आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA WC : Algeria Draw Against Russia, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : बेल्जियमचा रोमांचक विजयासह बादफेरी प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओ पाउलो - बेल्जियमचा स्‍टार स्‍ट्रायकर जन वेर्टोंघेनच्‍या एकमेव गोलच्‍या जोरावर बेल्जियमने दक्षिण कोरियाला पराभूत करुन बादफेरीत प्रवेश मिळविला आहे.
ग्रुप एच मध्‍ये अन्‍य सामन्‍यामध्‍ये अल्‍जीरिया आणि रशियाचा सामना 1-1 अशा गोलने ड्रा झाला होता. त्‍यामुळे रशियाचा बादफेरीपूर्वीच बाद झाला आहे. दुस-या फेरीमध्‍ये बेल्जियमचा सामना अमेरिकेसोबत होणार आहे. तर अल्‍जीरियाची लढत जर्मनीसोबत होणार आहे.

सुरुवात आक्रमक
दक्षिण कोरिया आणि बेल्जियम यांनी सुरुवातीला जोरदार आक्रमण केले. खासकरुन कोरियाचे खेळाडू जास्‍त आक्रमक वाटत होते. सुरुवातीला त्‍यांनी अनेकदा बेल्जियमच्‍या डीमध्‍ये प्रवेश केला होता. परंतु गोल करण्‍यात ते अयशस्‍वी ठरले. 78 व्‍या मिनिटाला बेल्जियमच्‍या जन वेर्टोंघेने गोल नोंदवत दक्षिण कोरियावर 1-0 ने विजय मिळविला.