साओ पावलो- अतिरिक्त वेळ संपण्यासाठी दोनच मिनिटांचा अवधी बाकी असताना मेसीच्या एका शानदान पासवर डी मारियाने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिना उपउपात्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळविला आहे. त्यांनी स्वित्झर्लंडचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. उपांत्यपूर्व लढतीत अर्जेन्टिनाची लढत आता अमेरिका-बेल्जियम यांच्यातील विजयी संघाशी होईल.
लियोनेल मेसी 'प्लेअर ऑफ द मॅच'
शकिरीमुळे विशेष बहरात असलेल्या स्वित्झर्लंडने अर्जेन्टिनाला अपेक्षेपेक्षाही अधिक झुंजवले. परंतु मेसीने अत्यंत कौशल्याने डी मारियाकडे अप्रतिम पास करत अर्जेटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळेच 'प्लेअर ऑफ द मॅच' मानकरी लियोनेल मेसी ठरला आहे.
स्विस प्रशिक्षकांचा अलविदा
स्विस संघाकडे अतिरिक्त वेळ असताना त्यांनी बरोबरी साधण्याची संधी दवडली. या पराभवानंतर स्वित्झलँडचे प्रशिक्षक ओत्तमार हिट्जफील्ड अलविदा करणार आहेत. सामना सुरु होण्यापूर्वीच त्यांचा भाऊ मृत्यू पावल्याची वार्ता त्याच्याकडे आली होती.
अतिरिक्त वेळेत कमाल
अतिरिक्त वेळेमध्ये स्वित्झलँडसंघाने जोरदार आक्रमण करत सुरुवात केली. मेसीने एकट्यानेच समोर धावत जावून डी मारियाकडे पास दिला. मारियानेही चूक न करता गोल नोंदवला.
(फोटोओळ- फुटबॉलवर ताबा मिळविताना मेसी)
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची छायाचित्रे...