क्युबा- 20व्या फिफा वर्ल्ड कपच्या ग्रुप-सीच्या एका सामन्यात कोलंबियाने जोरदार प्रदर्शन करून जपानला 4-1 ने पराभूत केले. या विजयासोबत कोलंबियाने बादफेरीत आपली जागा सुनिश्चित केली आहे. विजयी संघाकडून जॅक्सन मार्टीनने दोन गोल केले, तसेच जुआन कौड्रेडो आणि जेम्स रोड्रिगुइज यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.
जुआनने केली आक्रमक सुरूवात, 17व्या मिनटाला केला गोल
हा सामना रोमांचक ठरला. आशियाई विजेत्यांच्या विरोधात जुआन कौड्रेडोने 17व्या मिनिटाला पहिला गोल करून कोलंबियाला 1-0ने बढत मिळवून दिली. त्यानंतर जपानने जोर लावायला सुरूवात केली, परंतू कोलंबियाच्या बळकट बचावफळीला ते भेदू शकले नाहीत.
शिंजी ओकाजाकीने साधली बरोबरी
जपानसाठी शिंजी ओकाजाकीने 47व्या मिनिटाला गोल केला. हा गोल 'डी'च्या अत्यंत जवळून करण्यात आला. विरोधी टीमच्या गोलकीपरने लांब उडी मारून बॉलपर्यत पोहचायच्या आतच गोल झाला, यावरून बॉलच्या गतीचा अंदाज बांधता येऊ शकतो. या गोलमुळे जपानने कोलंबियाच्या विरोधात 1-1 ने बरोबरी केली.
जेम्स आणि जॅक्सनसाठी नव्हते जपानकडे उत्तर
जपानच्या बरोबरीला येण्यासाठी कोलंबियाच्या खेळाडूंनी जोरदार हल्ला करत करत एकानंतर एक तीन गोल केले. जॅक्सन मार्टीनेंज याने 55व्या आणि 82व्या मिनिटाला गोल करून जपानच्या विरोधात आपल्या टीमला 3-1 बढत मिळवून दिली. कोलंबियाकडून चौथा गोल 90व्या मिनिटाला जेम्स रोड्रिगुइजने गोल केला.
( फोटोओळ- सामना जिंकल्यानंतर आनंद साजरा करताना कोलंबियाचे खेळाडू)
पुढच्या स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सामन्यांची काही निवडक दृश्य