रिओ दी जानेरिओ - उरुग्वेच्या लुईस सुवारेझने सामन्यादरम्यान इटलीच्या जॉजिर्यो चिलीनीला चावा घेतल्याच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे मेक्सिकोचे पंच मार्को रॉड्रिग्ज यांची फिफाने सेमीफायनलसाठी पंच म्हणून नियुक्ती केली आहे.
बेलो हॉरिजोंटेमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुआरेझने चिलीनीच्या खांद्याला चावा घेतला होता. मात्र, त्याकडे रॉड्रिग्जचे लक्षच नव्हते आणि याबद्दल त्यांनी सुआरेझला मैदानावर कोणतीच शिक्षा केली नव्हती. फिफाने नंतर चौकशी करून सुआरेझवर बंदी घातली होती. २४ जून रोजी झालेल्या या सामन्यात उरुग्वेने इटलीला १-० असे हरवले.