आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA WC : Diego Godin Shine Uruguay Enter In Knockout With Crash Italy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एक विश्वविजेता ‘आऊट’, उरुग्वेने इटलीला 1-0 ने हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नटाल - स्पेन, इंग्लंडसारखे दिग्गज संघ स्पध्रेतून बाहेर झाल्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा एका विश्वविजेत्यावर स्पध्रेबाहेर पडण्याची नामुष्की आली. ग्रुप ‘डी’ च्या लढतीत मंगळवारी उरुग्वेने माजी विश्वविजेता इटलीला 1-0 ने पराभूत करून अंतिम-16 मध्ये स्थान मिळवले. सामन्याच्या 81 व्या मिनिटाला दिएगो गॉडिनने हेडर करून उरुग्वेला विजयी आघाडी मिळवून दिली. अध्र्या डझनापेक्षा जास्त गोल वाचवणारा इटलीचा गोलकीपर बफोनला ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले.
ग्रुप ‘डी’ मधून प्रत्येकी सहा गुणांसह कोस्टारिका व उरुग्वेच्या संघांनी नॉकआऊटमध्ये प्रवेश केला आहे. उरुग्वेने साखळीच्या तीन सामन्यांत मारलेल्या सहा किकवर चार गोल करण्याचा करिश्मा केला. दुसरीकडे, इटलीला तीन सामन्यांत फक्त तीनच गुण मिळवता आले.
सुआरेझ विरुद्ध बफोन : हा सामना इटली विरुद्ध उरुग्वे नव्हे तर सुआरेझ विरुद्ध बफोन असा ठरला. चपळ स्ट्रायकर सुआरेझने सामन्यात सहापेक्षा जास्त वेळा गोलपोस्टरवर हल्ला चढवला. मात्र, त्यात तो अपयशी ठरला. सुआरेझ मागच्या सात सामन्यांपैकी एकूण पाच सामन्यांत गोल करण्यात यशस्वी ठरला. मात्र या सामन्यात तो गोलसाठी तरसत होता. रॉड्रिग्ज आणि कावानी यांच्या अग्रक्रमातील अव्वल जोडीने शानदार प्रदर्शन केले.
बेलोटेली निष्प्रभ : इटलीचा स्टार खेळाडू बेलोटेली या सामन्यात चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने आक्रमणासोबतच बचावफळीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने 11 व्या मिनिटाला गोलची संधी निर्माण केली होती. मात्र, त्यात तो अयशस्वी ठरला.