आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA WC: Ronaldo Shine In Portugal Win Over Ghana, Divya Mar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC: रोनाल्‍डोचे पोर्तूगाल जिंकूनही हरले अन् अ‍मेरिका हरुनही जिंकले !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझिलिया- स्टार स्ट्राइकर आणि पोर्तूगालचा कर्णधार क्रिस्टीयानो रोनाल्डो आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत फुटबॉलच्या महासंग्रामात पहिला गोल केला. त्याच्या चांगल्या खेळीने पोर्तूगालने आपल्या शेवटच्या सामन्यात घाणाला 2-1 ने पराभूत केले, परंतू बादफेरीत प्रवेश करू शकला नाही.
पराभवानंतरदेखील अमेरिका पोहोचला बादफेरीत
जर्मनीकडून पराभूत झाल्यानंतरदेखील अमेरिका ग्रुपमधल्या संघातून बादफेरीत प्रवेश मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. अमेरिका आणि पोर्तूगाल या दोघांनाही 4-4 गुण होते, परंतू गोलच्या अंतरात पुढे असल्यामुळे अमेरिकेचा संघ पुढच्या फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेच्या संघाने चार गोल केले आणि तितकेच झेलले, परंतू पोर्तूगालने देखील चार गोल केले असले तरी त्याच्या विरोधात सात गोल झाले.
जोस बोएच्या आत्मघाती गोलने पोर्तूगालला 31 व्या मिनिटाला बढत मिळवून दिली, तर रोनाल्डोने 80 व्या मिनिटाला विजयी गोल केला. यादरम्यान असमोह ग्यानने 57व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. घाणाने रोनाल्डोला घेरून ठेवण्याची रणनीति आजमावली, परंतू सेंट्रल स्ट्राइकरच्या रूपात खेळणाऱ्या या स्टार फुटबॉलपटूने आपली उपस्थिती दाखवून दिली.
तो पहिल्या हाफमध्ये दोनदा गोलपोस्टपर्यंत पोचला, परंतू गोलकीपर फदावू दौदाने त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरवले. त्याच्याकडे 19व्या मिनिटाला चांगली संधी मिळाली, जोओ परेराने उजवीकडून घाणाच्या बॉक्समध्ये बॉल पोहचवला. रोनाल्डोने यावर जोरदार हेडर दिला परंतू दौदाने मात्र हुशारीने त्याला थांबवण्यात चूक केली नाही.
(फोटोओळ - गोल करण्याची संधी गमावल्यानंतर हातात बॉल घेऊन पोर्तूगालचा कर्णधार रोनाल्डो आणि त्याच्याकडे बघताना घाणाचा बोए)
पुढच्या स्लाइड्सवर पाहा सामन्याचे फोटोज्...