आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्येक व्यक्तीचा उद्देश केवळ फुटबॉलच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - आपल्याकडे यात्रेत हरवलेले भाऊ, मित्र, माता-पिता यांच्यासंबंधीच्या कथा बर्‍याच प्रसिद्ध आहेत. या कथा बॉलीवूडच्या अविभाज्य घटक ठरल्या आहेत. मात्र, फुटबॉल विश्वचषकात याउलट आहे. येथे कुणी हरवत नाही, तर हरवलेले भेटतात. ब्राझीलमध्ये येत असलेला प्रत्येक जण फक्त फुटबॉल पाहण्यासाठीच येथे येत आहे असे नाही. येण्याचे प्रयोजन फुटबॉल असले तरी प्रत्येक जण मैदानात जाईलच असेही नाही. बरेच लोक फुटबॉलमध्ये काही रस नसतानाही ब्राझीलमध्ये येत आहेत.

कॅलिफोर्नियातून आली जेनिफर (लोपेझ नव्हे)..जेनिफरचे आईवडील सामने बघण्यासाठी चिलीतून पायी आले आहेत. ती तिच्या आईवडिलांना मागच्या दोन वर्षांपासून भेटलेली नाही आणि यानंतर आणखी दोन वर्षे भेटू शकणार नाही. आईवडील येथे येणार आहेत हे ऐकून तिने आठवडाभराची सुटी घेतली आहे.

फुटबॉलचे सामने बघणार का? असा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, मला केवळ फुटबॉलच नाही तर अन्य कोणत्याच खेळात रस नाही. मात्र, माझ्या कुटुंबीयांना फुटबॉलची खूप आवड आहे. आईवडील विश्वचषकाच्या प्रेमाखातर चार वर्षांची बचतही पणाला लावून टाकतात. मी त्यांना माझ्यासोबत अमेरिकेत चला, असे म्हटल्यास त्यांना चालणार नाही. मात्र, फुटबॉलसाठी काहीही करायला तयार होतील. आईवडील सामना बघतील तेव्हा तू काय करशील? असे विचारले तेव्हा ती म्हणाली, भटकंती करेल किंवा झोप काढेल. जेनिफरला फक्त आईवडिलांच्या प्रेमामुळेच फुटबॉल आवडतो, अन्यथा तिचा खेळाशी काहीच संबंध नाही. वेगवेगळ्या देशांत राहणार्‍यांना जवळच्या लोकांना भेटण्यासाठी ब्राझील सध्या कमी खर्चात जास्त आनंद देणारा पर्यटनस्थळ ठरत आहे.