आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fifa World Cup 2014 Animals Tapped To Predict Game Outcomes, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC-2014: कोण विजेते ठरणार याचे भविष्‍य वर्तवणार प्राणी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
FIFA WC-2014 मधील रोमांचक लढती हजारो चाहते स्‍टेडिअमवर प्रत्‍यक्ष पाहत आहेत तर अब्‍जावधी चाहते टीव्‍हीवर पाहत आहेत. सर्वांसमोर यंदाच्‍या मोसमातील विजेता कोण? असणार असा प्रश्‍न आहे. यावरुन वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत. गतवेळी दक्षिण आफ्रिकेमध्‍ये झालेल्‍या फीफाचे जर्मनीचा ज्‍य‍ोतिषी 'ऑक्‍टोपस' ने भविष्‍य वर्तवन धूम केली होती. तर यावर्षी कोण भविष्‍य सांगणार याविषयी वाचा या पॅकेजमधून..
पांडा कब्‍स - चीन
फीफाची भविष्‍यावानी करण्‍यासाठी चीनचा ऊंट 'जाएंट पांडा प्रोटेक्शन ऐंड रिसर्च सेंटर', सिचुआन चा पांडा कब्‍स तयारीला लागला आहे. पांडा समारे विविध देशांच्‍या नावाच्‍या बादल्‍यात खाद्य ठेवण्‍यात येणार आहे. पांडा ज्‍यामधील खाद्य खाईल त्‍या देशास विजते पदाचे भविष्‍य असेल.
दुबईचा शाहीन - उंट
दुबईमधील उंट ऑक्‍टोपसनंतरचा प्रबळ दावेदार मानला जातो. स्‍पेन आणि नेदरलँडमध्‍ये झालेल्‍या सामन्‍यापूर्वीच उंटाने नेदरलँडला घोषित केले होते. दररोज हा उंट कोणता संघ जिंकेल त्‍या देशाच्‍या झेंड्याजवळ जावून त्‍या झेंड्याचा वास घेवून सांगतो.

नेली - हथिनी
4 वर्षांच्‍या हथिनी नेलीला भविष्‍यकर्त्‍यांच्‍या यादीमध्‍ये दुस-या स्‍थानी बसवले आहे. नेलीची 87% भविष्‍यवानी खरी ठरली आहे. नेलीच्‍या 33 भविष्‍यवानींपैकी 30 भविष्‍यवानी ख-या ठरल्‍या आहेत.

कासव - ब्राझील
ब्राझीलचे 25 वर्षीस कासव 'सेबेकाओ' भविष्‍यवाणी करणार आहे. त्‍याने पहिल्‍याच सामन्‍यामध्‍ये ब्राझील जिंकणार असल्‍याचे भाकित केले होते. 'सेबेकाओ'ला ब्राझीलमधील एका गावामधील पोहण्‍याच्‍या तलावामध्‍ये ठेवण्‍यात आले आहे. कासवासमोर दोन देशाचे झेंडे टांगलेले असतात. त्‍याला एक- एक मासासुध्‍दा असतो. सोबत दोघांच्‍या मध्‍ये एक फुटबॉल्‍ा ठेवून त्‍यावर सुध्‍दा मासा ठेवण्‍यात येतो. कासव ज्‍या झेंड्याजवळील मासा खाईल त्‍या देशास विजयी असल्‍याचे सुचित केल्‍या जाते. जर त्‍याने फुटबॉलवरील मासा खाल्‍ला तर सामना ड्रा होणार असे भाकित असते.

युकेचा बुलडॉग
युकेचा 'रु' नामक बुलडॉग्‍ाकडे भविष्‍यवाणीची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे. 'रु' समोर बिस्किटांनी भरलेली तीन कटोरे ठेवली जातात. दोन कटो-यांमध्‍ये दोन देशांचा झेंडा ठेवला जातो. आणि मधल्‍या कटोत्‍यावर ड्रा लिहिले असते. 'रु' ज्‍या कटो-यामधील बिस्किट खाईल तशी भविष्‍यवाणी वर्तविली जाते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भविष्‍य वर्तवणा-या ज्‍योतिषांची छायाचित्रे...