आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup 2014 : Belgium Win 1 0 Against Russia During Their Group H Soccer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेल्जियम बाद फेरीत; रशिया 0-1 ने पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ - दुसर्‍या सामन्यातही विजयाची लय कायम ठेवत बेल्जियमने फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली. या संघाने रविवारी रात्री एच गु्रपच्या आपल्या दुसर्‍या सामन्यात रशियाचा 1-0 ने पराभव केला. याशिवाय बेल्जियमने दुसर्‍या विजयाची नोंद केली. आता बेल्जियमचे सहा गुण झाले आहेत.
डीवोक ओरिजीने 88 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर बेल्जियमने सामना जिंकला.
दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना खेळवला गेला. विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असलेल्या रशियाने उत्कृष्ट बचाव आणि आक्रमणावर भर दिला. त्यामुळे बेल्जियमचे गोल करण्याचे उद्देश पूर्ण होऊ शकले नाही. तसेच बेल्जियमच्या गोलरक्षकाने रशियाचा गोलपोस्टवरचा हल्लाही यशस्वीपणे परतावून लावला. परिणामी ही लढत 87 व्या मिनिटांपर्यंत शून्य गोलने बरोबरीत रंगली होती. अखेर, शेवटच्या दोन मिनिटांत ओरिजीने चमत्कारिक गोल केला.

हे संघ बाहेर
कॅमरून (ए ग्रुप), ऑस्ट्रेलिया (बी ग्रुप), स्पेन (बी ग्रुप), इंग्लंड (डी ग्रुप), बोस्निया (एफ ग्रुप).

यांचे आव्हान धोक्यात
जपान (सी गु्रप), ग्रीस (सी ग्रुप), घाना (जी गु्रप), अल्जेरिया (एच गु्रप)