आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA World Cup 2014: Benzema Shine As France Trash Jamaica 8 0 Latest News In Marathi

दिग्‍गज फुटबॉलपटू फॉर्ममध्‍ये येताच बनविला नवा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - माजी चॅम्पियन फ्रान्‍सने जमैकाला सराव सामन्‍यात 8-0 ने मात देऊन फीफा वर्ल्‍ड कपचे आपण दावेदार होवू शकतो असे संकेतच दिले आहेत. 1998 चा चॅम्पियन ठरलेल्‍या फ्रान्‍सचा हा सर्वांत मोठा विजय आहे.
करीम बेनजेमाने केले दोन गोल
फ्रांन्‍स संघ खेळाच्‍या हाप टाईमपर्यंत 3-0 अशा आघडीवर होता. त्‍यामध्‍ये दोन गोल करीम बेनजेमाच्‍या नावावर आहेत. करीमने(38व्‍या आणि 63 व्‍या) मिनीटाला गोल केले.
इटलीच्‍या विजयात इममोबाईलची हॅटट्रिक
सिर्को इममोबाईलच्या हॅटट्रिकच्या जोरावर इटलीने ब्राझीलमधील क्‍लब फ्लुमिनेन्सचा 5-3 असा पराभव केला. इटलीने आपल्या अनेक खेळाडूंना विश्रांतीच दिली होती. त्यातच खराब मैदानामुळे त्यांना अपेक्षित वर्चस्व राखता आले नाही. ब्राझीलमध्ये जन्मलेल्या; पण इटलीकडून खेळणाऱ्या थिएगो मोत्ता याची चाहत्यांनी सतत हुर्यो उडवली. इटलीचा सरावातील हा पहिलाच विजय. ते लक्‍झेम्बर्गविरुद्ध पराजित झाले होते; तर आयर्लंडने त्यांना रोखले होते.
इराणचा त्रिनिदाद टोबॅगोवर सोपा विजय
इराणने सराव सामन्यात त्रिनिदाद टोबॅगोला 2-0 असे हरविले. एहसान हाजी आणि रेझा घुचॅन्नेजिहाद यांनी गोल करीत इराणला विजयी केले. इराणने सरावाच्या मैदानावरच ही लढत आयोजित केली होती आणि ती बंद दारामागेच झाली. या सामन्याच्या वेळी काही मोजके पत्रकार सोडल्यास कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे...