आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • FIFA World Cup 2014 Enner Valencia Become A Superstar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIFA WC : एकेकाळी बूट खरेदी करण्यासाठी विकले दूध, आज आहे सुपरस्टार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमिक्समध्ये नेहमीच असं वाचलं जातं की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा सुपरहीरोची एन्ट्री होते. इक्वॅडोरच्या एनर वेलेंसियानेदेखील होंडुरसविरूद्धच्या सामन्यात असाच खेळ केला. त्याने या सामन्यात दोन गोल करून 2-1 अशा फरकाने आपल्या टीमला विजय मिळवून दिला. यामुळे इक्वॅडोरने बादफेरीत प्रवेश केला आहे. या 25 वर्षीय स्ट्राईकरची गोष्ट अशीच रोमांचक आहे.
इक्वॅडोरकडून वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक गोल
11 एप्रिल, 1989 ला इक्वॅडोरच्या सेन्ट लॉरेंजो येथे जन्मलेल्या वेलेंसियाचं बालपण गरीबीत गेलं. त्याचे वडील दूध विकायचं काम करायचे. वेलेंसियाला फुटबॉलची आवड होती, परंतू त्याच्याकडे खेळासाठी चांगले बूट नव्हते. वडीलांची कमाई वाढवण्यासाठी तो वडीलांना कामात मदत करायचा. वेलेंसिया स्वतःदेखील गायीचं दूध काढायचा आणि विकायला जायचा. यानंतरच त्याला बूट विकत घेता आले.
सर्वाधिक गोल करणा-यांच्या यादीत नाव
वेलेंसियाने वर्ल्ड कपमध्ये इक्वॅडोरकडून सर्वात जास्त(3) गोल करणा-या ऑस्टिन डेलगाडोच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तो या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त(3) गोल करणा-या अर्जेन रॉबेन, रॉबिन वान पर्सी, बेंजेमा तसंच जर्मनीच्या थॉमस म्युलर यांच्या रांगेत आला आहे.

(फोटोओळ - होंडुरसच्या विरोधात इंजुरी टाइममध्ये गोल केल्यानंतर जल्लोष करताना इक्वॅडोरचा एनर वेलेंसिया)

पुढच्या स्लाईडवर वाचा फिफाचे काही रोमांचक रेकॉर्डस्...