रियो डी जिनेरियो - संघामध्ये सुसुत्रतता आणि उत्कृष्ट ताळमेळ असलेल्या फ्रान्स संघाने काल(25 जून) रोजी इक्वाडोरला बरोबरीत रोखून बादफेरीत प्रवेश केला आहे. सोबतच त्याने ग्रुप 'एफ'मध्ये प्रथम स्थान मिळविले आहे.
पहिल्या हाफमध्ये आक्रमक सुरुवात
1998 चा वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स आणि इक्वाडोरच्या खेळाडूंनी एकमेंकांविरोधात जोरदार आक्रमणे केली. 12 मिनिटाला फ्रान्सला गोल करण्याची संधी होती. पण त्या संधीचे सोने करता आले नाही.
दुस-या हाफमध्ये इक्वाडोरचे जोरदार प्रतिहल्ला
दुस-या हाफमध्ये इक्वाडोरने फ्रान्सवर जोरदार प्रतिहल्ला केला. ते गोल करण्यात अयशस्वी राहिले. 88 व्या मिनिटाला फ्रान्सच्या पोग्बाला गोलची संधी होती पण तोही गोल करु शकला नाही. इक्वाडोरचा बचाव एवढा मजबूत होता की, 1998 चा वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स एकही गोल करु शकला नाही.
(फोटोओळ - इक्वाडोरा अयोवी कीक मारताना)
पुढील स्लाइडवर पाहा, छायाचित्रे..