आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA World Cup 2014: Indian Condoms Sell Like Hot Cakes, Divya Marathi

FIFA WORLD CUP: ब्राझीलमध्‍ये भारतीय कंडोमची मागणी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतीकात्‍मक फोटो)
नवी दिल्‍ली - फीफा विश्‍व चषकामुळे ब्राझीलमध्‍ये भारतीय बनावटीच्‍या कंडोमची मागणी वाढली आहे. केरळच्‍या एचएलएल लाइफकेअर या कंपनीने 15 लाख कंडोम ब्राझीलमध्‍ये पाठविले आहेत.
ब्राझीलमध्‍ये देहव्‍यापाराला मान्‍यता आहे. जगभरातील फुटबॉल प्रेक्षक तेथे आल्‍याने हा व्‍यवसाय तेजीत आला आहे. त्‍यामुळे ब्राझीलमध्‍ये कंडोमची आवक मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. सोबतच गर्भनिरोधन गोळ्यांची मागणीही जास्‍त आहे. एचएलएल लाइफकेअर कंपनीने गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये 70 कोटी कंडोम्‍स ब्राझीलमध्‍ये पाठवले आहेत.
ब्राझील सरकार प्रत्‍येक वर्षी अंदाजे 1 अब्‍ज कंडोम खरेदी करते. यावर्षी या आकड्यांमध्‍ये 20 टक्‍यांनी वाढ झाली आहे. भारतीय कंपनी ब्राझीलच्‍या बाजारामध्‍ये 30 ते 40 टक्‍यांची भागीदार आहे. ही कंपनी 'मूड्स' कंडोम ब्राझीलमध्‍ये पाठवते. त्‍याचबरोबर जगभरामध्‍ये 115 देशांना कंडोम पुरविते. 2013-14 मध्‍ये या कंपनीने 133 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कंपनीमध्‍ये दररोज 40 लाख कंडोमची निर्मिती होत असते.