20 व्या फीफा वर्ल्ड कपला 12 जूनपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपच्या 84 वर्षांच्या इतिहासात एकही विदेशी कोच आपल्या संघाला चॅम्पियन्स बनवू शकला नाही. ही या फुटबॉल महाकुंभाची खास गोष्ट आहे. त्यामुळे ब्राझीलच या वर्षीचा चॅम्पियन्स ठरु शकतो अशी क्रिडातज्ज्ञांची तसेच चाहत्यांची मते बनली आहेत.
इटलीचे विटोरिया पोजा आतापर्यंतचा सर्वांत सफल प्रशिक्षक ठरला आहे. त्याने आतापर्यंत आपल्या संघाला 1934 आणि 1938 मध्ये वर्ल्ड कपचा चषक जिंकून दिलाआहे.
स्कॉलारी यांना पोजोशी बरोबरी करण्याची संधी
लुईस फेलिप स्कॉलारी आता पोजोची बरोबरी करु शकतात. 2000 मध्ये ब्राझीलने स्कॉलारी यांच्या मार्गदर्शनाखाली कप जिंकला होता.
14 संघाचे आहेत विदेशी कोच (प्रशिक्षक)
टीम - कॅमरून, कोच - वॉल्कर फिंके, देश - जर्मनी
टीम - चिली, कोच - जॉर्ज सेम्पाओली, देश - अर्जेंटीना
टीम - कोलंबिया, कोच - जोस पेकरमॅन, देश - अर्जेंटीना
टीम - ग्रीस, कोच - फर्नांडो सेंटोस, देश - पुर्तगाल
टीम - आइवरी, कोच - कोस्ट साबरी, देश - फ्रांस
टीम - जपान, कोच - एल्बर्टो, देश - इटली
टीम - कोस्टा रिका, कोच - लुइस पिंटो, देश - कोलंबिया
टीम - स्विर्झलँड, कोच - ओटमार, देश - जर्मनी
टीम - इक्वाडोर, कोच - रीनाल्डो रुइडा, देश - कोलंबिया
टीम - होंडुरास, कोच - लुइस सुआरेज, देश - कोलंबिया
टीम - ईरान, कोच - कार्लोस क्वीरोज, देश - पोर्तुगाल
टीम - अमेरिका, कोच - क्लिंसमॅन, देश - जर्मनी
टीम - अल्जीरिया, कोच - वाहिद, देश - बोस्निया
टीम - रूस, कोच - फेबियो कापेलो, देश - इटली
पुढील स्लाइडवर वाचा काही रंजक रेकॉर्डस